Home महाराष्ट्र बोगस कामगार संघटनांवर कायदेशिर कारवाई करा; अंबिका हिंगमिरे याची मागणी

बोगस कामगार संघटनांवर कायदेशिर कारवाई करा; अंबिका हिंगमिरे याची मागणी

मुंबई

श्रमिक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या संस्थापक तथा अध्यक्ष अंबिका अजय हिंगमिरे यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुंबई येथिल मुख्यालयात .श्रीरंगम, सचिव यांची भेट घेतली. यावेळी बोगस कामगार संघटनांवर कायदेशिर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन सादर केले.

या भेटी दरम्यान हिंगमिरे यांनी कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांच्या पुढे मांडल्या. प्रामुख्याने वर्धा जिल्हयात बोगस कामगार संघटनामार्फत होत असलेले गैरप्रकार याची माहितीही हिंगमिरे यांनी सचिवांना दिली.
चर्चेदरम्यान या बोगस कामगार संघटनामार्फत कामगारांचे होत असलेली पिळवणुक, कामगारांकडून वसूल करण्यात येत असलेले कमिशन थांबविण्याबाबत निवेदन दिले व या बोगस कामगार संघटनांची न्यायालयीन चौकशी करावी व दोषी आढळून येणाऱ्या विरुध्द कायदेशिर कारवाई करण्याबाबत मागणी केली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments