Home Uncategorized स्वयंसिद्धा

स्वयंसिद्धा

 

 सौरभ अढाऊ

असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची
भीती अंधारे ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही
चौक करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची
मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
विदा करंदीकरांच्या ह्या ओळी प्रमाणे साक्षात जगत असलेली उद्योग उभारणी क्षेत्रात नावारूपाला आलेल हे व्यक्तिमत्व अमरावती हिची जन्मभूमी नसताना अमरावतीला कर्मभूमी बनवलं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध केल्. बायकांचे नेहमी असंच असतं लग्न झाल्यानंतर माहेर सोडून जेव्हा सासरी येते तेव्हा तेथील व्यक्ती, अनुभव ,शहर ,सर्व वेगळ असतं आणि त्यात प्रत्येकाचे नातं जोडावं लागतं .ते कुटुंबात असो वा समाजात ,नव्याने मित्र मैत्रिणी जोडावे लागतात .अहो स्वतःला सिद्ध करावं लागतं! आणि हे सर्व करून दाखवलं ते प्राध्यापिका मोनिका आशिष उमक. यांनी ती म्हणते…. आपली परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारावी पण ती आपल्याला जशी हवी तशी बनवावी…..

खरंच या प्रमाणेच तिने स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियानाला सिद्ध करून दाखवलं हे अभियान सध्या अमरावती शहराची शान झालेला आहे. हे अभियान कागदावर नसून साक्षात असं आहे असं साक्षात अभियान तिने उभा केलं. या अभियानाची सुरुवात माननीय श्री किरण भाऊ पातुरकर यांच्या प्रेरणेतून झाली भाऊंच स्वप्न म्हणजे तळागाळातील प्रत्येक महिला, युवकांना उद्योजक झालेलं पाहणं. ते म्हणतात” रोजगार मागणारे होण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा” हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे ‘उद्योजक बनवूया उद्योजक घडवूया ‘या तत्वाने अभियान आज नावारूपाला आलेल् दिसून येते अमरावतीमध्ये एम आय डी सी इंडस्ट्रियल असोसिएशन 12 मार्च 2018 ला उद्योजक महिलांचा सत्कार मोठ्या प्रमाणात घेतला होता आणि तेव्हाच स्वयंसिद्धा अभियानाची घोषणा केल्या गेली. हे अभियान तेव्हापासून सुरू झाले ते आज रोजी एवढ्या स्वरूपात विस्तारल्या गेलेले दिसून येते. या छोट्याशा काळात या अभियानातून 5000 उद्योजकांना उद्योजकबनवण्याचे मार्ग दिले त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे धडे दिले गेले .यामध्ये शंभर महिलांचे उद्योग आज रोजी सुरू झालेले आहेत. तर 45 महिला उद्योजक ज्यांना त्यांच्याच उद्योगामुळे प्रसिद्धीचे व्यासपीठ या स्वयंसिद्धा न्याय मिळवून दिले, आणि त्यांच्यासाठी समृद्धी साधने बनविली आणि पुन्हा अशा यशस्वी महिलांचा सत्कार 8 मार्च 2020 रोजी करण्यात आला या सर्वांचे सूत्र सांभाळणारी सर्वांना एक सूत्रात बांधून ठेवणारी जिच्या एका शब्दात काम होतात.आणि तिने टाकलेला शब्द कधी वाया जाणार नाही. हेही तेवढंच महत्त्वाचं तिच्या शब्दांची धार कधी बोथट होणार नाहीच या व्यक्तिमत्वाला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणावं लागेल तिचं कुटुंब, दोन मुलं ,घर मैत्रिणी आणि स्वतःची आवड जोपासून आणि त्यात सतत हसतमुख राहणारी ही एक आधाराचं वटवृक्ष म्हणावं लागेल हिला प्रत्येकाची जाण आहे म्हणजे, ‘ नकोस मी आहे ना! ‘थांबू नकोस मी करते ना! हेच तिचं वाक्य आपल्याला ऐकायला मिळते ती म्हणते
मनातील स्वप्ने खूप मोठी असावी ती पूर्ण करण्याची कारणं मात्र नसावी.
अशीही मोनिका उमक तुला पुढील आयुष्यात खूप यश मिलो तुझ्यामुळे कोणाच्या घरात जर चुल पेटत असेल ,कोणाचा हरवलेला स्वाभिमान परत मिळत असेल, तुझ्यामुळे उद्योग क्षेत्रात महिलांना मानाचे स्थान मिळत असेल तर त्याचा आनंद सर्वांनाच आहे खरच तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्त्रीयांना आपलं अस्तित्व जगवायचं असेल तर, “आर्थिक दृष्टीकोनातून सक्षम होणे” याची आज नितांत गरज आहे आणि तेवढच गरजेचं, त्यासाठी गंभीरतेने प्रयत्न करणे. चला स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान आपल्या पाठीशी आहे, उद्योजक बनू या उद्योजक घडवू या.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments