Home ताज्या घडामोडी महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

मुंबई

महाराष्ट्रात सलग दोन दिवस नव्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा आकडा ओलांडल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी तर नव्या रुग्णसंख्येने ११ हजारांचा आकडा पार केला आहे. राजयात कोरोनाचा कहर वाढला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.

आज एकूण ११ हजार १४१ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज दिवसभरात एकूण ६ हजार १३ रुग्ण बरे झाले आहेत. सततच्या झपाट्याने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहेया बरोबरच राज्यात दिवसाला मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णसंख्येत कालच्या तुलेनेत काहीशी घट झाली आहे. आज राज्यात एकूण ३८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४७ इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ६८ हजार ०४४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के इतके झाले आहे.

तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६८ लाख ६७ हजार २८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख १९ हजार ७२७ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.१६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ४ लाख ३९ हजार ०५५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४ हजार ६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढून ती आज एकूण ९७ हजार ९८३ इतकी झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ९ हजार ३१९ इतकी झाली आहे. तर ठाण्यात ही संख्या १० हजार २९४ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २० हजार ३४७, नाशिक येथे ४,७४१, अहमदनगर येथे १,८६९, औरंगाबाद येथे ४,२६४,६०४, नागपूर येथे ११ हजार ६३५, कोल्हापूर येथे ४८७ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गोंदिया आणि गडचिरोली येथे आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या प्रत्येकी १७५ इतकी आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments