Home विदर्भ अमरावती जिह्यात महिला सुरक्षा जनजगर; राष्ट्रवादी काँग्रेसचे उपक्रम

अमरावती जिह्यात महिला सुरक्षा जनजगर; राष्ट्रवादी काँग्रेसचे उपक्रम

अमरावती

महाराष्ट्र राज्यातील महिलांची सुरक्षा अधिक प्रभावी करण्याच्या निमित्ताने तसेच पोलिस दलाकडून होत असलेल्या उपाययोजनांची माहिती मिळावी यासाठी येत्या ८ मार्च २०२१ च्या जागतिक महिला दिनानिमित्ताने संपूर्ण वर्षभर “महिला सुरक्षा जनजागर” अभियान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून राज्यभर व जिल्हाध्यक्ष संगीता अनिल ठाकरे अमरावती जिल्हात राबविणार आहे.
या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे, नव्याने निर्माण झालेले कायदे, सायबर गुन्हेगारी, तसेच महिलांनी आपल्या सुरक्षेची काळजी कशी घ्यावी याबाबत अमरावती जिल्ह्यात सर्व तालुका स्तरावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्य करणार आहे. त्या त्या भागातील पोलिस ठाण्यात महिलासाठी मार्गदर्शन व्याख्याने तसेच तत्सम कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
त्यानुसार सायबर सेल ,कायदा आणि सुव्यवस्था तसेच अन्य विभागातील संबंधित अधिकारी वर्गाची व्याख्याने किंवा मार्गदर्शन हे या महिलांसाठी आयोजित करण्यास सहकार्य करावे. याबाबतचे निवेदन आज आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब अमरावती ग्रामीण यांना जिल्हाध्यक्ष संगीता अनिल ठाकरे यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी प्रदेश सचिव सौ. कल्पनाताई वानखडे शहर जिल्हाध्यक्ष सौ.सुचीताताई वनवे शहर कार्याध्यक्ष सौ.संगीता देशमुख जिल्हा सचिव सौ.ममताताई हूतके जिल्हा सरचिटणीस सौ.पद्माताई पुरी या उपस्थित होत्या

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments