Home ताज्या घडामोडी महाराष्ट्रात शुक्रवारी आढळले 15 हजार 817 कोरोनरुग्ण; 56 दगावले

महाराष्ट्रात शुक्रवारी आढळले 15 हजार 817 कोरोनरुग्ण; 56 दगावले

मुंबई

महाराष्ट्रातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तर, काही ठिकाणी लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकाडाउन लागतो की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. राज्यातील प्रमुख शहरांसह अन्य शहरांमध्य दरोरज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. तर, आज दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. तर, ५६ रूग्ण दगावले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

शुक्रवारी ११,३४४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,१७,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७३,१०,५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,८२,१९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४२,६९३ व्यक्ती गृहविलगीकरणा मध्ये आहेत. तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments