Home ताज्या घडामोडी मेळघाटात जपानी मॉडेलच्या ८ पिस्टलसह २ युवकांना खकनार जंगलातून अटक

मेळघाटात जपानी मॉडेलच्या ८ पिस्टलसह २ युवकांना खकनार जंगलातून अटक


अमरावती

जिल्ह्यातील धारणी पासून जवळच असलेल्या मध्यप्रदेशातील खकनार जंगलातून ८ जणांना बनावट पिस्टलसह बुऱ्हाणपूर पोलिसांनी दोन युवकांना अटक केल्याने मेळघाटात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरील बुलडाणा जिल्ह्यातील पाचोरी गावात शस्त्रे बनविण्याचे घरगुती कारखाने अनेक दिवसांपासून सुरू आहेत. बुरहानपूरचे पोलिस अधिक्षक राहूल लोढा,यांचे मार्गदर्शनात दोन दिवसापूर्वी खकनार पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी दांत पहाडाजवळ दोन जणांना अडविले. त्यांचे जवळून जापानीमॉडलच्या ८ पिस्तुली जप्त करण्यात आल्या.सातपूडा पर्वतांच्या श्रृखंलेला बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरिल पाचोरी गावात अवैधपणे विविध शस्त्रे तयार केली जातात.दानसिंग,प्यारसिंग सिकलीगड तथा हरपाल सिंग,ओंकारसिंग, यांना अटक करण्यात आली. धारणी तालुक्यातील बारातांडा जावऱ्यापासून अवघ्या २० कि.मी.अंतरावर पाचोरी गाव असून गावाला बुलढाणा जिल्हयाच्या संग्रामपूर तालुक्याची सिमा देखील लागूनच आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments