Home विदर्भ आखतवाडा आग नुकसानाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

आखतवाडा आग नुकसानाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

पीडितांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ कार्यवाही करावी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती,

आखतवाडा येथील आग नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
आखतवाडा येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमुळे पाच झोपड्या जळून नुकसान झाले.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी आखतवाडा येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्तांचे सांत्वन करत त्यांना दिलासा दिला.
नुकसानग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तत्काळ कार्यवाही करावी व त्यांना शक्य ती सर्व मदत मिळवून द्यावी, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
तहसीलदार योगेश फरताडे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments