Home ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यात गुटखा विक्री बंद करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

अमरावती जिल्ह्यात गुटखा विक्री बंद करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

अमरावती

राज्यामध्ये 2012 पासून आघाडीच्या सरकारने “गुटखा बंदी” केली असतानाही हा कायदा पायदळी तुडवीत अमरावती जिल्ह्यात व शहरात प्रत्येक पान टपरीवर अवैधरित्या गुटका व तंबाखू मिश्रित पान मसाला राजरोसपणे सर्रास विक्री होत असल्याचे वास्तव्य आहे व त्यामुळे तरुणाई, मजुर,पुरुष व महिला वर्ग व्यसनाधीन होत असून कर्करोग व तोंड बंद होण्याचे आजार वाढत असून जिल्ह्यात गुटखा विक्री विरोधात कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतींने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव कल्पना वानखडे, जिल्हा सचिव ममता हुतके, शहर कार्याध्यक्ष संगीता देशमुख, जिल्हा सरचिटणीस अस्मिता भडके, भातकुली तालुका अध्यक्ष सरला इंगळे उपस्थित होत्या.

परराज्याच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर गुटखा व प्रतीबंधीत अन्नपदार्थांची आयात होत असल्याचे दिसते कधीकधी वाहन चालकावर व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसते,परंतु ठोस कारवाई कोणतीही घेतल्या जात नाही. गुटखा विक्रेत्यांना शासकीय अधिकारांचा तसेच पोलीस अधिकाऱ्यांचा कोणताही धाक असल्याचे दिसत नाही.गुटका विक्री करणे किंवा त्याचे वितरण करणे गुन्हा ठरतो व त्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता “अन्न व औषधी प्रशासन” हा स्वतंत्र विभाग असताना त्या अधिकाऱ्यांची डोळेझाक असल्याचे चित्र दिसत आहे. आपणास नम्र निवेदन की राज्याच्या सीमेवरून येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवर कडक तपासणी करण्यात यावी व गुटखा विक्री करणाऱ्या वर कडक शिक्षेची अंमलबजावणी होईल हे बघावे. तरीही गुटका विक्री होत असल्यास सीमेवर असलेल्या तपासणी अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments