Home ताज्या घडामोडी मनसेने केली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

मनसेने केली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

अमरावती

वरुड येथील वीज वितरण कंपनीचे शेंदूरजनाघाट उपकार्यकारी अभियंता कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी जाऊन अधिकार्याना शिवीगाळ तसेच वीज पुरवठा खंडित केला तो जोडून द्या असे म्हणत कार्यालयातील संगणकासह खुर्च्या आणि काचा तोडफोड करून वीज वितरण कार्यालयाचे एक लाख रुपयाचे नुकसान केले . या संदर्भात अभियंता विनोद काळे यांचे तक्रारीवरून पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या मनसे तालुकाप्रमुखसह ७ लोकाविरुद्ध गुन्हे दाखल केले असून आरोपीचा शोध सुरु केला आहे .
पोलीस सूत्रानुसार , आज १७ ला दुपारी एक वाजून १५ मिनिटांसह दरम्यान वरुड येथील वीज वितरण कंपनीचे शेंदूरजनाघाट उपविभागाचे कार्यालयात मनसे तालुका अध्यक्ष रोशन लोखंडे सह ५ ते ७ कार्यकर्ते गेले होते . तेंव्हा सक्तीची वीजबिल वसुली बंद करून खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करून द्या अशी मागणी केली . तेंव्हा उपकार्यकारी अभियंता विनोद काळे यांनी वीज बिल भरल्याशिवाय वीज पुरवठा जोडता येणार नाही असे सांगितले . यावेळी अधिकार्यांसह उपस्थित कर्मचाऱयांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून बाहेरून डॉ युवकाई लाकडी दांडे आणून मनसे तालुकाध्यक्षासह कार्यकर्त्यांनी संगणक , टेबले वरील काच , खुर्च्या , सीसीटीव्ही स्क्रिन सह आदींची तोडफोड केली . तसेच कर्मचारी आणि अधिकार्यालाना ढकलून शिवीगाळ केली . तोडफोड करून शासकीय माळमातीचे एक लाख रुपायाचे नुकसान केले असल्याची फिर्याद वरुड पोलीस स्टेशन मध्ये उपकार्यकारी अभियंता विनोद काळे यांनी दिल्यावरून पोलिसांनी मनसे तालुकाध्यक्ष रोशन लोखंडे , प्रज्वल मानकर , अधिक पाच अनोळखी इसम असे ७ लोकांविरुद्ध भादवीचे कलम ३५३ , १४३ , १४७ , १४९,४२७ आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३ नुसार गुन्हे दाखल केले आहे . तर आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आले . या घटनेचाच वरुड पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकार यांचे मार्गदर्शनात एपीआय सुनील पाटील सह वरुड पोलीस करीत आहे . तर सबॉर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु ठाणेदाराने आरोपीला तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले .


- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments