Home ताज्या घडामोडी कोरोनामुळे राज्यात एकाच दिवशी 132 रुग्णांचा मृत्यू

कोरोनामुळे राज्यात एकाच दिवशी 132 रुग्णांचा मृत्यू

मुंबई

राज्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब सरकारी आकडेवारीवरून समोर आली आहे. त्यामुळे करोना पुन्हा एकदा राज्यात उग्र रुप धारण करतोय की काय, अशी भिती आता आरोग्य यंत्रणांना वाटू लागली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.null

राज्य सरकारने नुकतीच करोनासंदर्भात नवी नियमावली जारी केली असून त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, कार्यालये या ठिकाणी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षक किंवा कर्मचाऱ्यांना परवानगी असेल, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अनेक वेळा नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. “नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने अंतिम उपाय म्हणून लॉकडाऊनचा पर्याय असेल”, असा इशारा देखील सरकारकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वाढती करोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा पुन्हा एकदा राज्याला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन जाण्याची शक्यता आहे.

मंगळवारच्या आकडेवारीनुसार, राज्यात दिवसभरात एकूण १३ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दुसरीकडे एकूण २८ हजार ६९९ नव्या करोनाबाधितांची भर देखील पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा आता २५ लाख ३३ हजार ०२६ इतका झाला आहे. त्यापैकी २ लाख ३० हजार ६४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर करोनामुळे राज्यात आजपर्यंत ५३ हजार ५८९ मृत्यू झाले आहेत.

मुंबईतल्या ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ३ हजार ५१२ नवे करोनाबाधित सापडले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून रिकव्हरी रेट आता ९० टक्क्यापर्यंत आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने देखील यंदा होळी आणि धुलिवंदन हे उत्सव खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर बंदी घातली आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments