Home ताज्या घडामोडी मुंबईमध्ये रुग्णालयात आग, ७० करोना रुग्णांची सुटका; दोघांचा मृत्यू

मुंबईमध्ये रुग्णालयात आग, ७० करोना रुग्णांची सुटका; दोघांचा मृत्यू

मुंबई

मुंबईमध्ये मॉलमधील एका रुग्णालयात लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. भांडूपमध्ये रुग्णालयात करोना रुग्णांवरही उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर जवळपास ७० करोना रुग्णांची सुटका करण्यात आली. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ड्रीम्स मॉल सनराइज हॉस्पिटलमध्ये ही आग लागली.
मुंबईत एकीकडे करोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असतानाच आग लागल्याची ही घटना घडली. गुरुवारी मुंबईत तब्बल ५५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

 

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री १२.३० वाजता रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी एएनआयला दिली. ७३ पैकी ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिघांना फोर्टीस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. याशिवाय इतर रुग्ण हॉस्पिटलच्या इतर वॉर्डमध्ये दाखल आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये रुग्णालय पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७० रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments