Home ताज्या घडामोडी दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबाला न्याय मिळण्यासाठी खंबीरपणे पाठीशी : ऍड. यशोमती ठाकूर

दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबाला न्याय मिळण्यासाठी खंबीरपणे पाठीशी : ऍड. यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांकडून दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाचे सांत्वन

अमरावती

दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आपण खंबीरपणे चव्हाण कुटुंबाच्या पाठीशी आहोत, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज मोरगाव येथे सांगितले.

महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे जाऊन दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबाला भेट दिली व त्यांचे सांत्वन करून दिलासा दिला.

कुटुंबातील व्यक्ती जाण्याने होणारी हानी कधीही भरून येत नाही. या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपालीसारखी एक कर्तबगार अधिकारी आपल्यातून निघून गेली आहे. या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एक कुटूंबीय म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दीपाली यांचे पती राजेश मोहिते, सासू, दीर व नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री यांनी दीपाली चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी चव्हाण यांच्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

दिवंगत दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करू. यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी विशाखा समित्या तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.
मेळघाटात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments