Home Health & Fitness रसाहार , असाध्य रोगावर परिणामकारक उपचार

रसाहार , असाध्य रोगावर परिणामकारक उपचार

 जागतिक आरोग्य दिन विशेष 

 

✒️प्रा. शोभना देशमुख

माणसाची स्वस्थ आणि सुखी राहण्याची धडपड व प्रयत्न पाहता स्वानुभवावरुन काही गोष्टी उपयुक्त वाटल्यामुळे त्या व्याधीग्रस्त व स्वस्थ वाचकांपर्यंत पोहचाव्यात म्हणून हा लेख . मानवाला होणाऱ्या ७० ते ८० टक्के आजारांचा मार्ग पोटातुन जातो असे म्हटले जाते . सुधारणेच्या नावाखाली माणूस जसा जसा निसर्गापासून दुर गेला व जात आहे तेवढा तो जास्त व्याधीग्रस्त होतांना दिसत आहे . या दृष्टीने विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की , कच्च्या पालेभाज्या किंवा फळभाज्या शिजवल्या तर त्यातीलल पाचक रस , एन्झाईम्स व जीवनसत्त्वे जी स्वास्थाला अत्यंत उपयुक्त आहेत ती नष्ट होतात व पचनसंस्थेला शरीराच्या पाचक रसावर अवलंबून राहावे लागते व वयोमानाप्रमाणे वरील रसाचे शरीरातील निर्मिती करणारे सक्षम नसतील तर खाल्लेली साखर कोण पचवणार न पचवलेली साखर रक्तात वाढली तर मधुमेहाची सोबत येणारच . एक साधे उदा . रक्तात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले तर संधिवातासारखे आजार उद्भवतात , वाढलेल्या युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी कच्च्या भाज्या व फळभाज्या यामध्ये युरीक ॲसिड कमी करण्याचे गुणधर्म आहेत . जर या भाज्या / रस , रसाहाराचे सेवन नियमानुसार वापरले तर कंबरदुखी पाठदुखी , संधिवात त्रासदायक होत नाहीत व झाले असतील तर दुरुस्त होतात . थोडक्यात आपणा निसर्गापासून जेवढे दुर जाऊ , व्याधी तेवढ्या जवळ येतील . तेव्हा जास्तीत जास्त नैसर्गिक व अकृत्रिम रहा . सुधारणेबरोबर निसर्गाचेही स्मरण ठेवावे . सदर लेख वाचकांना कोरोना काळात उपयुक्त मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा करते . आज मनुष्य आधुनिकतेच्या नावाखाली निसर्गापासून जेवढा दूर जात आहे . तेवढा जास्त तो रोगग्रस्त / व्याधीग्रस्त होताना दिसतो आहे . ह्रदयरोग , मधुमेह , कर्करोग , उच्च रक्तदाब या आजारांवर कायमचे उपचार नाहीत . व्यायाम , पथ्यपाणी , नियमित औषधोपचार याचा अवलंब करुन आजार आटोक्यात ठेवणे एवढाच मार्ग हातात आहे . अशा व्यक्ती तणावमुक्त राहूच शकत नाहीत . नेहमी तणावात राहिल्यामुळे व्याधी वाढतात व व्याधीमुळे ताण वाढतो, असे दुष्टचक्र चालू राहते . झोपलेली व्यक्ती सकाळी उठेलच याची खात्री स्वतःलाही नाही आणि घरच्या लोकांनाही नाही . या असाध्य आजारांनी आताच एवढे उग्ररुप का धारण केलले आहे ? जगातील तज्ज्ञ मंडळी संशोधन करत आहेत . त्यातच रोजच्या बातम्यात वेगवेगळ्या पॅथीच्या लोकांचे अहवाल झळकत असतात . जसे National Acupuncture Organization of India , Dr. Jaykumar Dixit यांच्या मते मधुमेह कायमस्वरुपी बरा होऊ शकतो . या सर्व बाबींचा विचार केला तर वास्तव प्रकर्षाने पुढे येते ते असे की , मनुष्य प्राणी जेवढा नैसर्गिक आहारापासून दूर गेला व अग्नी संस्कारित आहाराच्या सानिध्यात गेला तेवढा वरील आजाराच्या विळख्यात अडकत गेला . आता स्थिती अशी आहे की , आपण आता अग्नी संस्कारित अन्नापासून मागे फिरु शकत नाही . पण त्यास नैसर्गिक आहाराची जोड दिली तर वरील आजारांना दूर ठेवू शकतो आणि त्यासाठीच रसाहार , रस उपवास , आहारात कच्च्या पालेभाज्यांचा वापर , सॅलड खाणे , सुकामेव्याचा वापर इत्यादी उपयुक्त वाटतात . आहार हेच माणासाचे आरोग्य आहे , आहार हेच औषध आहे . अन्न शिजवल्याने त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होतो पण त्याला जर मोड आणले तर त्यातील पोषक द्रव्याची अधिक वाढ होते . रसाहार काय आहे ? रसाहार म्हणजे आपल्या रोजच्या वापरातील पालेभाज्या , फळे , कंदमुळे यांचा रस काही गोष्टीची पथ्ये पाळून सेवन करणे , याला रसाहार म्हणतात . पथ्य पाळणे म्हणजे काही भाज्या , फळे , ठराविक व्याधी असलेल्या रुग्णाला त्यांच्या रसाहारात वापर करता येत नाहीत . उदा . मुत्रविकाराच्या रुग्णाला पालकाची भाजी चालत नाही . मधुमेहींना आंबा , चिक्कू , बटाटा वयं आहे . रसाहार घेतांना पाळावयाचे नियम : रसाहार नेहमी अनेक भाज्यांचा घ्यावा . २ ) भाज्या / फळे / कंद ताजे असावेत व रस काढण्यापुर्वी त्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात .
2 पालेभाज्या व फळांचा रस एकत्र घेऊ नये . दोन रसामध्ये ४ तासांचे अंतर असावे . पाले भाज्यांचा रस सकाळी उपाशीपोटी घ्यावा व त्यानंतर ४ तासांनी फळांचा रस घ्यावा . रस काढल्यानंतर तो २०-२५ मिनिटांच्या आतच घेतला पाहिजे , नाहीतर त्यातील जिवनसत्वांचे ऑक्सिडेशन होते . काही नष्ट होतात किंवा उपयुक्त स्वरुपात राहात नाहीत . रस घेण्यापुर्वी व नंतर अर्धातास काहीच खाऊ नये . काही व्यसने असल्यास ती सोडावीत . रसाहारामुळे व्यसन सुटायला मदत होतच असते . ७ ) अनेक भाज्या व फळभाज्या कंदासह एकत्र असल्यामुळे याला मिश्र रसाहार म्हणणे योग्य वाटते . अशा मिश्र रसामध्ये भाज्याचे , फळभाज्या व कंदाचे प्रमाण खालीलप्रमाणे असावे . ४० % पालेभाज्या- उदा . पालक , शेपू , मेथी , करडी , अंबाडी , चुका , मुळ्याची पाने , कोबी इ . ३० % फळभाज्या- वांगी , दोडका , टोमॅटो , कोबी , फ्लॉवर , लसून इ . ३० % कंद- गाजर , मुळा , बटाटे , आले इ . रस चावून ( त्यात तोंडातील लाळ मिसळण्यासाठी ) प्यावा म्हणजे लाळेतील पाचकरस ( Enzyme ) व भाज्यामधील पाचकरस एकत्र मिळतील . रस उपवास करावयाचे झाल्यास एकदम सुरुवात करु नये . क्रमशः १ वेळेत रसाहार , २ वेळेस नेहमीचा आहार घ्यावा . दुसरे दिवशी २ वेळा रसाहार व एक वेळा नेहमीचा आहार घ्यावा . तिसरे दिवशी पूर्ण रसाहार घ्यावा . ८ ते ११ दिवस रसाहारावर राहावे व पुन्हा आहारावर येण्यासाठी क्रमशः आहार सुरु करावा पण नेहमीसाठी दररोज एक वेळा रसाहार घेतलेला चांगला असतो . १० ) रस उपवास करताना व्यायाम करु नये . थोडेफार चालणे , बस ! काम पण करु नये . आराम घ्यावा .
3 ११ ) दात , जबड्याचे स्नायू , पचन संस्थेचे संबंधित अवयव कमकुवत होऊ नयेत म्हणून थोडी फळे किंवा सुकामेवा खावा . १२ ) रसाची चव बदलण्यासाठी मीठ / साखरेचा वापर करु नये . १३ ) रसाहार श्रद्धेने करावा . विचार – आचार स्वच्छ ठेवावेत . १४ ) रसाहाराचा हेतू स्पष्ट हवा . आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी / व्याधीमुक्त होण्यासाठी वगैरे . १५ ) रसाहार नियमित घ्यावा , वेळ बदलू नये . १६ ) व्याधीमुक्तीसाठी रसाहार घ्यावयाचा असल्यास भाज्याची व फळभाज्याची निवड विचारपुर्वक करावी . १७ ) रसाहाराचे प्रमाण वरील सूचनांचे पालन करुन रस कितीही घेतला तरी चालतो . योजना बद्ध व नियमितपणे रसाचे जितके जास्त सेवन कराल तितके लवकर व्याधीमुक्त व्हाल . १८ ) असाध्य व भयंकर रोगापासून मुक्त व्हायचे असेल तर दीर्घकाळापर्यंत रसाहार चालू ठेवणे आवश्यक आहे . रसाहाराबरोबर सुकामेवा किंवा फळे खावीत . ती २० मिनिटांनंतरच खावीत व नंतर खाल्यानेच रसाहारातील पाचक रसाचा पचनासाठी उपयोग होईल . रसाहाराचे फायदे : १ ) पालेभाज्या व फळामधील जीवनसत्त्वे , क्षार व पाचकरस नैसर्गिक स्वरुपात मिळतात . ह्याच भाज्या शिजवल्यास त्यातील जीवनसत्वे व पाचकरस नष्ट होतात व क्षारांचे इतर संयुगात रुपांतर होते . २ ) भाज्यांचा रस / फळांचा रस रक्तात शोषला जाण्यास फक्त २०-२५ मिनिटे लागतात . त्याच ठिकाणी शिजवलेले / अग्नीसंस्कार केलेल्या भाज्या पचनासाठी ( रक्तात शोषले जाण्यासाठी ) ३-४ तास लागतात . त्या भाज्याही शरीर पोषणासाठी , कच्च्या भाज्या एवढ्या उपयुक्त नसतात .

३ ) रसाहारामुळे तारुण्य टिकून राहाते . शिजवलेल्या अन्नामुळे वृद्धात्व लवकर होते . तारुण्यातील पदार्पणाचे वय गुणिले आठ एवढे आयुष्य ( चांगले निरोगी आयुष्य ) प्रत्येक मनुष्याला मिळाले पाहिजे . जे रसाहारामुळेच शक्य आहे . ४ ) रसाहारामुळे कमी श्रमात पचन संस्थेकडून जास्त पोषक घटक शरिराला पुरवले जातात . रसाहाराचे तोटे : रसाहारापासून तोटे तर नाहीतच पण रस उपवास करणाऱ्या माणसाच्या दात , जबड्याचे स्नायू , पचनसंस्था यांना श्रम पडत नसल्यामुळे हे अवयव कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही . म्हणून रस चावून घ्यावा तसेच रस उपवासात फळे खावीत .

गृहविज्ञान विभाग, शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती .
संचालक, डाॅ पंजाबराव देशमुख अर्बन को. बँक अमरावती
विभागीय अध्यक्ष
जिजाऊ ब्रिगेड अमरावती.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments