Home ताज्या घडामोडी महाराष्ट्रात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, उद्या होणार निर्णय

महाराष्ट्रात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, उद्या होणार निर्णय

मुंबई

  महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकानं उच्चांक गाठला आहे. दोनदा कोरोनाची लस घेणाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत एकमत झाले आहे.  उद्या टास्कफोर्सची बैठक बोलाविण्यात आली असून त्या बैठकीतच लॉकडाऊन लावायचा व किती दिवसांचा लावायचा याचा निर्णय होणार आहे. याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  

महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदि उपस्थित होते. सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  बैठकीत दिलीप वळसे-पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार,  तात्याराव लहाने, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे बैठक पार पडली. बैठकीत कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर चर्चा करण्यात आली.  सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती बैठकीत दिली.  

या बैठकीत सामान्य जनतेच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. दोन तास ही बैठक चालली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा, आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. सरकारच्या निर्णयाची जनतेला माहिती द्या. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. अजित पवारांनी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय पॅकेज देता येईल, ते सोमवारी ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

राज्यामध्ये कोरोनाचा आकडा सव्वापाच लाखांवर गेला आहे. यामुळे तातडीने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. एकीकडे हा विषय असताना सामान्यांवरील संकटही आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांत रोडमॅप तयार करणार आहेत. ती झाल्यानंतर कडक लॉकडाऊन करण्यात येईल, नंतर हळूहळू हे निर्बंध शिथील करण्यात येतील, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज चर्चा झालीय, निर्णय झालेला नाहीय, उद्या यावर चर्चा होईल असे ते म्हणाले. लोक वाचले पाहिजेत, असे चव्हाण यांनी सांगितले.  

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments