Home ताज्या घडामोडी मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निगेटीव्ह अहवाल आवश्यक

मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निगेटीव्ह अहवाल आवश्यकअनावश्यक विनामास्क फिरणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी
ऑक्सीजन, रेमडेसीवीरचा योग्य उपयोगाच्या सुचना
लसीच्या उपलब्धतेवर लसीकरण सुरू राहणार


अमरावती,

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा निगेटीव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आले आहे, याची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मध्यप्रदेश राज्याने याआधीच चाचणी करणे बंधनकारक केले आहे. अमरावती जिल्ह्यात रविवारपासून दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी गरजेचे आहे. मात्र अत्यावश्यक सेवा, मालवाहतूक, रूग्णवाहिकांसाठी यातून सूट असेल. शहरात विनामास्क अनावश्यक फिरणाऱ्यांची फिरत्या पथकातर्फे दंडासोबतच ॲन्टीजेन चाचणी करण्यात येत आहे. त्यासोबतच जीवनावश्यक वस्तू सोडून सुरू असलेल्या इतर दुकाने आणि आस्थापनांवर कार्यवाही करण्यात येत आहे. आवश्यकता पडल्यास दुकानांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.
रेमडेसीवीर आणि ऑक्सीजनची उपलब्धता प्रमाणात आहे. त्यामुळे रूग्णालयांना अत्यावश्यक असल्यासच कमी प्रमाणात रेमडेसीवीरचा उपयोग करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. माफक दरात ही औषधे मिळण्यासाठी पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णांमध्ये सुधारणा दिल्यास रेमडेसीवीरचा उपयोग थांबविण्यात यावा. तसेच ऑक्सीजन पातळी वाढल्यास रूग्णांचा ऑक्सीजन पुरवठा थांबवावा, अशा सूचना रूग्णालयांना देण्यात आल्या आहे.
जिल्ह्यातील लसीकरण नियमित सुरू आहेत. लसीच्या पुरवठ्यावर लसीकरण केंद्र सुरू राहतील. लसीमुळे कोरोनाची लागण झाली तरी संसर्ग कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज न बाळगता 45 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. लसीकरणानंतरही हात धुणे, मास्कचा उपयोग, परस्परांमध्ये अंतर राखण्याचे नियम नागरिकांनी पाळावे. जिल्ह्यात कोरोनाचे डबल म्युटेशन झालेले नाही. जिल्ह्यातून पाठविलेल्या चाचण्यांचा याप्रकारे कोणताही अहवाल प्राप्त झाला नाही, असेही जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments