Home ताज्या घडामोडी निष्कारण फिरणाऱ्या नागरिकांच्या भरचौकात चाचण्याजिल्हा प्रशासनाची धडक मोहिम

निष्कारण फिरणाऱ्या नागरिकांच्या भरचौकात चाचण्या
जिल्हा प्रशासनाची धडक मोहिम

अमरावती,

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निष्कारण घराबाहेर फिरणाऱ्या बेजबाबदार कोविडप्रसारकांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची धडक मोहिमच जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यात राबवली. राजकमल चौकात या धडक मोहिमेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सहभागी होत कारवाईला चालना दिली.

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह विविध अधिकारी मोहिमेत सहभागी होते. शहरात विनाकारण ‍फिरणाऱ्या नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. हा संसर्ग थांबविण्‍यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी संचारबंदीत विनाकारण ‍फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड अॅंन्‍टीजन चाचणी करण्‍याचा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. अमरावती शहरात उपक्रमाची गुरुवारपासून अंमलबजावणी करण्‍यात आली. उपायुक्‍त रवि पवार यांनी रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक यांच्‍या मदतीने विनाकारण ‍फिरणा-यांची अँन्टीजन चाचणी केली.

राजकमल चौक आणि राजापेठ चौकात विनाकारण ‍फिरणाऱ्यांची अॅन्‍टीजन चाचणी करण्‍यात आली. २०८ नागरिकांची अॅंन्‍टीजन चाचणी करण्‍यात आली आहे. इतवारा बाजार येथे रॅपिड अॅंन्‍टीजन टेस्‍ट शिबिर घेण्‍यात आले होते. त्याठिकाणी १ व्‍यक्‍ती पॉझिटिव्‍ह आढळली.

जिल्ह्यात ठिकठिकाणी ही मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. चांदुर रेल्वेच्या जुन्या एस. टी. स्थानकावरही ४० जणांना तपासण्यात आले.

पॉझिटिव्ह आढळल्यास भरती
निष्कारण फिरणाऱ्यावर कारवाई करतानाच पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या व्यक्तींना तत्काळ कोविड केअर केंद्रात उपचारार्थ दाखल केले जाणार आहे.

अमरावतीच्या मोहिमेत सिटी कोतवाली पोलीस स्‍टेशनचे वरीष्‍ठ पोलीस निरीक्षक विजय आठवले, सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, डॉ. संदिप पाटबागे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे, स्‍वास्‍थ निरीक्षक मनिष हडाले, प्रिती दाभाडे, धनिराम कलोसे, अविनाश फुके, सिटी कोतवाली पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

राजकमल चौकातील तीन दुकाने सील

लॉकडाऊनमध्‍ये जीवनावश्‍यक वस्‍तु वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्‍याचे निर्देश असतांना राजकमल चौक येथे खुले असलेल्या दुग्‍धपुर्णा शितालय दुकान, विमल डिजिटल लॅब, श्री बालाजी दुकानावर मनपाच्‍या पथकाने कारवाई करुन दंड ठोठावला. संचारबंदी काळात अत्‍यावश्‍यक वस्‍तु न पुरविणारे दुकाने सुरु असतांना आढळली म्‍हणून दुग्‍धपुर्णा शितालय दुकान, विमल डिजिटल लॅब, श्री बालाजी दुकानाला यावेळी सिल करण्‍यात आले. सदर कार्यवाही दरम्‍यान सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्‍हाण, निरीक्षक आनंद काशीकर, अभियंता संकेत वाघ, मनोज इटनकर, शुभम चोमडे, सागर अठोर, राहुल वैद्य, मनपा कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments