Home ताज्या घडामोडी मेळघाटात कोरोना उपचारासाठी भूमकाकडे गेलेल्या आदिवासी महिलेचा मृत्यू

मेळघाटात कोरोना उपचारासाठी भूमकाकडे गेलेल्या आदिवासी महिलेचा मृत्यू

मृतदेह रात्रीभर घरातच ठेवला : वीस तासानंतर अंत्यसंस्कार

अमरावती

कोरोना तपासणीत पॉझिटिव निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी नजिकच्या गावात भुमका कडे गेली. दरम्यान गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. मृतदेह सेमाडोह गावी आणण्यात आला. पॉझिटिव असल्याने प्रशासनाने रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले मात्र नातेवाईकांनी नकार दिला शुक्रवारी दुपारी२ वाजता.वीस तासानंतर महिलेवर नातेवाईकांनी अखेर अंत्यसंस्कार करण्यात केला घटनेने मेळघाटात खळबळ उडाली आहे

सेमाडोह येथील एक ४५ वर्षीय विधवा महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह येथे रॅपिड एंटीजन तपासणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल १२ एप्रिल रोजी दहा वाजून पन्नास मिनिटांनी डॉक्टरांनी दिला व सदर महिलेला गृहाविलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला होता.

तपासणी अहवालात पॉझिटिव निघाल्याने कोविड संदर्भात आवश्यक औषध प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या देखरेखीत असताना आपणास काहीच आजार झाला नाही कोरोना नाही असे तिने आरोग्य यंत्रणेला सुनावले उपचारासाठी सेमाडोह पासून दहा किमी अंतरावरील भवई गाव गाठले तेथे नातेवाईकांकडे जाऊन कोरोना व तिला असलेल्या आजारावर भूमका कडे उपचार सुरू केला या दरम्यान आजार वाढल्याने शुक्रवारी तिचा मृत्यू झाला

कोरोना पॉझिटिव्ह सदर महिलेचा मृतदेह शुक्रवारी रात्री आठ वाजता सेमाडोह येथील घरीआणण्यात आला ही बाब गावकऱ्यांना समजतात त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर महेश कुर्तकोटी, जि प सदस्या सुनंदा काकड, सरपंच अनिता चिमोटे,ग्रामसेवक सुरेंद्र चिकटे ,आदींनी समजावीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पीईपी किट व साहित्य घेऊन तयार होते मात्र नातेवाईक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे हा मृतदेह रात्रभर घरीच ठेवण्यात आला अखेर शुक्रवारी दुपारी २ वाजता.अंत्यसंस्कार करण्यात आला

सेमाडोह येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू शुक्रवारी भवई गावात झाला उपचारासाठी मांत्रिकाकडे गेली होती अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी गुरुवारी रात्री प्रचंड विरोध दर्शविला अशी माहिती
चिखलदराच्या तहसीलदार माया माने यांनी दिली.

पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पीईपी किट घेऊन आरोग्य कर्मचारी स्थानिक प्रतिनिधी गुरुवारी रात्रभर त्यांच्या नातेवाईकांना समजून घातली मात्र त्यांनी काहीच ऐकले नाही कुरणावर औषध उपचार सुरू असताना भुमका कडे उपचारासाठी गेली व तेथे मृत्यू झाला अशी माहिती चिखलदरा तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments