Home ताज्या घडामोडी मेळघाटातील रानगव्याने रोखली पालकमंत्र्यांची वाट

मेळघाटातील रानगव्याने रोखली पालकमंत्र्यांची वाट

अमरावती

सातपुड्याच्या कुशीतील मेळघाट वृक्षसंपदा आणि वन्यजीवनाने समृद्ध आहे. त्याची प्रत्यक्ष अनुभूती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनाही परवाच्या मेळघाट दौऱ्यात आली. मेळघाटात कार्यरत महिला वन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यास निघालेल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या भेटीला रानगवाही पोहोचला. त्याने चक्क डांबरी रस्त्यावर येऊन पालकमंत्र्यांची वाट रोखली. गत गुरुवारी चिखलदरा -सेमाडोह मार्गावरून महिला व बालविकास मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा जात असताना मेमना गेटच्या पुढे अचानक रानगवा रस्त्यावर दाखल झाला आणि ताफ्यापासून सुरक्षित अंतरावर रस्त्याच्या कडेला तो उभा झाला. जणू काही आपण कोरोनाची नियमावली पाळत आहोत, असेच त्याला सुचवायचे होते.

दरम्यान, गाडी का थांबली हे जाणून घेण्याकरिता
मंत्री श्रीमती ठाकूर वाहनातून खाली उतरल्या. तेव्हा त्यांना रानगव्याचे दर्शन झाले.

दौऱ्यात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हेही सोबत होते. त्यांनी रानगव्याबाबत माहिती पालकमंत्र्यांना दिली.
बराच वेळेनंतरही रानगवा रोखलेली वाट मोकळी करीत नसल्याचे बघून पालकमंत्र्यांनी त्याला बाय करण्याचा निर्णय घेतला. आणि बायसनच्या बाजूने आपले वाहन हळुवारपणे काढत सेमाडोहच्या दिशेने त्या मार्गस्थ झाल्यात . यात निसर्गानेही हलक्या पावसाच्या सरींनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले.

मेळघाट हा नितांतसुंदर वनप्रदेश आहे. त्याच्या संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यापुढेही अभिनव उपक्रमांना चालना देण्याचा मनोदय पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments