Home ताज्या घडामोडी इंजेक्शनचा अवाजवी वापर टाळावा: ॲड. यशोमती ठाकूर

इंजेक्शनचा अवाजवी वापर टाळावा: ॲड. यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोविड रुग्णालयांची बैठक

अमरावती

खासगी रुग्णालयांमध्ये रेमडिसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर होता कामा नये. रेमडिसिविरच्या उपलब्धता व नियंत्रणासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, गरज नसेल तिथे अवाजवी वापर होणे चुकीचे आहे.याबाबत शासनाने वेळोवेळी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व रूग्णालयांकडून पालन व्हावे, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना उपचारात रेमडेसिवीर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ते तत्काळ थांबावे. गरज नसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही रेमडीसीविरबाबत मागणी होत असेल तर डॉक्टरांकडून त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. सर्व रुग्णालयांना गरजेनुसार इंजेक्शन, ऑक्सिजन आदी बाबी उपलब्ध करून दिल्या जातील. रेमडिसिविर, ऑक्सिजन, लस आदी सर्व बाबींची कमतरता भासू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, महामारीच्या या काळात आवश्यक तिथेच औषधांचा वापर, अवाजवी वापर टाळणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व रुग्णालयांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे. रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी व काळा बाजार होऊ नये यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. कोरोना उपचारांत वेळेवर निदान होणे, कुठलीही लक्षणे जाणवताच वेळीच प्रिव्हेंटिव्ह औषधोपचार सुरु करणे हेही गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संचारबंदी, कोरोना त्रिसूत्रीचे पालन बंधनकारक करण्याबरोबरच, जिल्ह्यात ‘स्टीम सप्ताह’ राबविण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली आत्मसात करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालयांनीही रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी संदेश प्रसारण, फलक आदी उपक्रम राबवावेत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. साथ नियंत्रणासाठी प्रशासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून उपचार, जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यवाही आदी विविध स्तरांवर प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना सर्वांनी साथ देण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी दिले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments