Home ताज्या घडामोडी कोरोनाकाळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठरतेय वरदान

कोरोनाकाळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठरतेय वरदान

2020 साल संपुर्ण मानवजातीला कोरोना महामारीच्या अनपेक्षित संकटात लोटणारे वर्षे ठरले. जेव्हा हे संकट उभे ठाकले तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की आरोग्य सुविधाकरीता मोठया प्रमाणात पायाभुत सुविधा निर्माण कराव्या लागतील. अमरावती मध्ये कोवीड रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रभावी ठरले ते अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल) टप्पा 2 ची तयार प्रशस्त इमारत. विेशेष म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल चे निर्माण *डॉ.सुनिल देशमुख* यांचे कार्यकाळात म्हणजे वर्ष 2008 मध्ये करण्यात आले होते. अमरावती हे विभागीय मुख्यालयाचे ठिकाण असून सुध्दा त्यावेळी रुग्णांची परिस्थीती खालावल्यावर अदयावत व उच्च उपचाराकरीता नागपूर मेडीकल कॉलेज शिवाय पर्याय नसायचा. स्वत: डॉक्टर असल्याने डॉ.सुनिल देशमुख यांनी अमरावती येथे अदयावत सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या निर्माणाचा निश्चय केला शासन स्तरावर सतत पाठपुरावा करुन 2001 साली सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करुन प्रशासकीय मान्यता आदेश निर्गमित करण्यात यश मिळविले. त्यानंतर निधीची तरतूद, इमारत बांधकाम, अदयावत यंत्र सामग्री व मनुष्यबळाचे नियोजन टप्पा टप्पाने करण्यात आले सरतेशेवटी आठ वर्षे अखंड परीश्रमपूर्वक केलेल्या मेहनतीला फळ येवून सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे किडनी शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी व पेडीयाट्रीक सर्जरी (लहान मुलांचे शस्त्रक्रिया) या सुविधांसह या रुग्णालयाचे लोकार्पण 10 मे 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे हस्ते रुग्णालय अमरावती करांच्या सेवेत लोकर्पित करण्यात आले. तेव्हा पासून आतापर्यंत हजारो गोर गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया तसेच मोफत डायलिसिस होवून त्याची ससेहोलपट थांबली. परंतू ऐवढयावरच समाधानी होतील ते डॉ.सुनिल देशमुख्‍ कसले. लगोलग शासन स्तरावर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल फेज-2 करीता मागणी करुन पाठपूरावा सुरु केला वर्षे 2009 साली मेदू विकार, हदय विकार व कॅन्सर उपचाराकरीता टप्पा -2 करिता मंजूरात करुन घेवून त्याचा शासन निर्णय निर्गमित करुन घेतला. परंतू दुर्दैवाने 2009 ते 2014 या पंचवार्षिक मध्ये खंड पडल्यामुळे यामध्ये फार प्रगती होवू शकली नाही. नव्याने 2014 साली आमदार झाल्यावर या विषयाकडे डॉ.सुनिल देशमुख यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन 2018 सालापर्यंत फेज-2 ची प्रशस्त इमारतीचे निर्माण करण्यात यश मिळविले. यानंतर लागणारी यंत्र सामग्री, मनुष्य बळाची उपलब्ध्दता याकरीता पाठपुरावा सुरु केला. यामध्ये यश सुध्दा आले. त्यानंतर विधानसभा निवडणूक 2019 मध्ये काय झाले हे सर्वांना माहीतच आहे .आणि त्यातच 2020 साली कोविड चे संकट उभे ठाकले आणि सर्वांना आठवण आली ती सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल च्या तयार इमारतीची जी डॉ.सुनिल देशमुख यांनी आधिच पूर्ण करुन घेतली होती. त्यामुळे प्रशासनाला पायाभूत सुविधेने पूर्ण असलेली इमारत तयार मिळाली. आणि विक्रमी कमी वेळात येथे कोविड रुग्णांनाकरीता अदयावत रुग्णालय सुरु झाले. 80 व्हेटिलेटर बेड, 250 ऑक्सिजन बेड व 100 साधे बेड सह दररोज 300 क्रिट्रीकल कोविड रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत. संपूर्ण महामारीच्या काळात 25 हजार च्या वर रुग्णांना या रुग्णालयाने आधार दिला आहे. सर्व सुविधायुक्त या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलची भव्य इमारत जर नसती तर या कोरोनाच्या बिकट काळात अमरावतीकरांचे काय झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही. महामारीच्या सुरवातीच्या काळात ऐवढया मोठया हॉस्पीटलची ऑक्सीजन वापराची मदार ही पूर्णपणे ऑक्सीजन सिलेंडर वरच होती. त्याचवेळी डॉ.सुनिल देशमुख यांच्या लक्षात ही बाब आली भविष्यात या रुग्णालयाची ऑक्सीजनची गरज भागविणे कठीण जाईल त्याकरीता भविष्याचा वेध घेत प्रशासनाने तातडीने किमान 10 K क्षमतेचा लिक्विड ऑक्सीजन प्लाँट स्थापित करावा अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांचेकडे केली. मागणी करुनच थांबले नाहीत तर अक्षरश: त्याचे मागे लागून व पाठपुरावा करुन 21K क्षमतेचा लिक्विड ऑक्सीजन प्लाँट मंजूर करुन घेतला व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल परीसरात स्थापन करुन घेतला. याची परीणिती अशी झाली की सर्वदूर ऑक्सीजन तुटवडयामुळे रुग्णांचे जिव कंठाशी आलेले असतांना अमरावती मध्ये याचा लवलेशही आढळला नाही. त्यामुळे दुसऱ्या जिल्हयातील ही जसे नागपूर, अकोला, चंद्रपूर पासून तर शेजारच्या राज्यातून अमरावती येथे येवून भर्ती झाले. या जागतीक कोविड महामारीच्या काळात अमरावती चे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल निर्माण करण्याकरिता डॉ सुनील देशमुख यांचे आणि या हॉस्पिटल ने क्रिटिकल रुग्ण आणि कोविड व्यवस्थापनात बजावलेली कामगिरी येणाऱ्या काळात सुर्वण अक्षरांनी नोंदविल्या जाईल हे निश्चित....! Bravo...

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments