Home ताज्या घडामोडी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी केली जनजागृती

गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी केली जनजागृती

अमरावती

कोरोना टाळण्यासाठी गर्दीवर नियंत्रण हा महत्वाचा उपाय असून कोरोना किती घातक आहे हे अमरावतीकारांच्या लक्षात आणून देण्यास गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरविलेला रेड कोरोनाची मदत घेतली. पोलिसांचा हा रेड कोरोना पाहून भागो कोरोना आय अशी प्रतिक्रिया शहरात उमटली. विषेध म्हणजे पोलिसांच्या या उपक्रमाचा परिणाम म्हणजे शहरातील गर्दी नेहेमीपेक्षा कमी झाली.

विनाकारण फिरू नका

शहरात सध्या कोरोनाने थैमान घातला असताना रविवारी जिल्ह्यात 21 जण कोरोनाने दगावले. परिस्थिती गंभीर असताना अनेकांचे प्राण वाचावे यासाठी शहरात गर्दी करू नका, विनाकारण घराबाहेर फिरू नका असा संदेश रेड कोरोनाद्वारे पोलिसांनी दिला.

लाल रंगाचा आक्राळ-विक्राळ मुखवटा घालून एक व्यक्ती रेड कोरोनाच्या वेशात शहरातील मुख्य चौकात पोलिसांसह दाखल झाली. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक, कॉटन मार्केट, इर्विन चौक या महत्त्वाच्या चौकात रेड कोरोनाद्वारे कोरोनाने अमरावतीकारांना नियमांचे पालन करून सुरक्षित राहा असे आवाहन केले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments