Home ताज्या घडामोडी वरुड तालुक्यात आयपीएल जुगारावर धाड

वरुड तालुक्यात आयपीएल जुगारावर धाड

अमरावती

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेनोडा ठाण्याच्या हद्दीतील वावरूळी स्थित यशवंत पोल्ट्री फॉर्मजवळील आईपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून सात आरोपींना अटक केली. अमोल पुंडलिक यावले(26), आकाश बाबा ब्राम्हने (24), मुकुल शंकर गणोरकर(23), मनीष सुभाष खडसे (24), विशाल ठाकरे ( 26 सर्व रा. जरुड जरुड), मंगेश विजय बीजवे (38), निलेश साहेबराव माकोडे(32 दोन्ही रा. वरूड) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 27 हजार 400 रुपयांची रोख, 17 मोबाईल, 670 रुपयांचे आयपीएल जुगारातील साहित्य, एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन असा एकुण 12 लाख 32 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अनेक दिवसांपासून सुरु होता सट्टा
आईपीएल क्रिकेट सामन्यात शनिवारी चेन्नई सुपर विरुध्द किंग मुंबई यांच्यात रंगला होता. या सामन्यावर हातजितचा जुगार आरोपी खेळत होते. क्रिकेट सट्ट्याची माहिती मिळताच एलसीबीचे पीआय तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुरज सुसतकर, पोलिस कर्मचारी चेतन दुबे, अमित वानखडे, युवराज मानमोठे, दीपक सोनालेकर, निलेश डांगोरे, स्वप्नील तंवर, चालक विनोद हिवरकर यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी आरोपी हे सट्टा खेळताना दिसले. या आरोपींची धागेदोरे अनेकांशी जुळल्याची माहिती पुढे आली असून, त्या अनुषंगाने आरोपींचीही संख्यादेखील वाढणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments