Home ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्याला रोज 3000 रेमडीसीवर वायलचा पुरवठा करा; खासदार नवनीत राणा...

अमरावती जिल्ह्याला रोज 3000 रेमडीसीवर वायलचा पुरवठा करा; खासदार नवनीत राणा यांची मागणी

अमरावती
अमरावती जिल्ह्याला रोज 3000 रेमडीसीवर वायलचा पुरवठा करावा अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांची दिल्ली येथे केंदीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांना प्रत्यक्ष भेटून केली.

कोरोनामुळे रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत,खाजगी सरकारी दोन्ही प्रकारचे हॉस्पिटल फुल्ल आहेत,रुग्णांना बेड नाहीत,ऑक्सिजन नाही,व्हेंटिलेटर नाही अश्या स्थितीत या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढत असून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतकांच्या नातेवाईकांना खूप प्रतीक्षा करावी लागत आहे .जिल्ह्यातील या भयावह परिस्थितीची माहिती खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिली.

कोरोना रुग्णांना दिलासा देणारे रेमेडीसीवर इंजेक्शन चा तुटवडा संपूर्ण जिल्ह्यात आहे.खाजगी रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन मिळविताना खूप त्रास होतो,,कधी कधी रुग्ण दगावतो सुद्धा. म्हणून खाजगी वितरकाना सुद्धा आवश्यक त्या प्रमाणात रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. सद्यस्थितीत सन फार्मा, हेट्रो लॅबोरेटरी,सिपला लॅबोरेटरी, झायडस कॅडीला, मायलॉन लॅबोरेटरी आणी जुबीलटं या कंपन्यांचे प्रत्येकी 1200 रेमेडिसवर वायल आवश्यक असतांना अनुक्रमे 440,2605,760,96, अश्या संख्येने 3904 इंजेक्शन उपलब्ध आहेत व 4704 इंजेक्शन चा तुटवडा आहे ही सर्व आकडेवारी मंत्रीमहोदयांसमोर ठेवून प्रतिदिन नियमितपणे 3000 रेमडीसीवर वायल अमरावती जिल्ह्याकरिता वितरित करण्यात यावे अशी मागणी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी डॉ हर्षवर्धन यांचे कडे केली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments