Home महाराष्ट्र अमेरिकेत असणाऱ्या रत्नदीप जोशी यांनी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला दिली दोन लाख रुपयांची...

अमेरिकेत असणाऱ्या रत्नदीप जोशी यांनी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला दिली दोन लाख रुपयांची देणगी

आजीच्या स्मृत्यर्थ दिला निधी

आजी मालतीबाई जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष

अमरावती

आजी मालतीबाई जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज अमेरिकेत स्थायिक असलेला त्यांचा नातू रत्नदीप मुकल जोशी यांनी २ लाखाची भरीव देणगी डॉ . हेडगेवार हॉस्पीटलच्या आयसीयु साठी प्रदान केली आहे . मालतीबाई या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचे अलीकडेच निधन झाले .
जनकल्याण सेवा संस्था संचालित डॉ. हेडगेवार हॉस्पिटल भाराणी मेमोरियल क्रिटिकल केअर युनिट साकारत असून यासाठी निधीची आवश्यकता आहे, अशी साद हॉस्पिटलच्या डाएटिशियन डॉ. संध्या जोशी यांनी त्यांचा सुपुत्र श्री . रत्नदीपला दिली. या सादाला प्रतिसाद देत त्याने, आजी मालतीबाई जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सादाला प्रतिसाद देत रत्नदीप यांनी परदेशातून २ लाख रुपयांची देणगी प्रदान केली आहे .
फेसबुक मध्ये कार्यरत रत्नदीप जोशी यांनी ही देणगी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या प्रस्तावित आयसीयु साठी प्रदान केलीय . अमेरिकेत राहूनही भारताशी नाळ जोडलेले रत्नदीप महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे माजी कार्यकारी अभियंता श्री. मुकुल जोशी आणि डॉ. संध्या जोशी यांचे सुपुत्र आहेत . आजी मालतीबाई जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी ही देणगी प्रदान केली आहे . मालतीबाई या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचे अलीकडेच निधन झाले .
डॉ. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयातून निवृत्त झालेल्या डॉ. संध्या जोशी या डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये (डायटीशीयन) आहारतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. संध्या जोशी यांच्या पुढाकाराने हॉस्पिटलतर्फे आहार व जीवनशैली या विषयावर मासिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. नामवंत वक्ते, डॉक्टर्स आणि आहारतज्ञांच्या मार्गदर्शन व चर्चेमुळे अनेक लोकांपर्यंत या विषयाचे महत्व पोहोचले. अशा अनेक परीने डॉ. संध्या जोशी व त्यांचे कुटुंब सामाजिक आरोग्य क्षेत्रात योगदान देत आहेत. त्याकरिता जोशी परिवाराचे अभिनंदन होत आहे.जगाच्या पाठीवर कुठेही असलं आणि आपल्या मातृभूमीशी नाळ जुळलेली असली की मदतीचा हात समोर येतोच, याची सुखद प्रचिती डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला आली आहे. देणगीचा धनादेश रत्नदिपच्या वतीने डॉ. संध्या जोशी यांनी , संस्थाध्यक्ष श्री. अजय श्रॉफ आणि प्रकल्प संचालक डॉ. यशोधन बोधनकर यांना प्रदान केला . यासाठी संस्थेने त्यांचे आभार मानले आहेत.
डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये खाजगी दवाखान्याच्या तुलनेत ३० ते ४० टक्के सवलतीत उत्तम वैद्यकीय उपचार दिले जातात. धर्मादाय हॉस्पिटल म्हणून गेल्या ८ वर्षात रुग्णांचा विश्वास या हॉस्पिटलने संपादन केला आहे. मात्र आय .सी .यु . अभावी गंभीर परिस्थितीच्या रुग्णांना उपचारार्थ अन्य दवाखान्यात पाठवावे लागत होते. यामुळे जनकल्याण सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळींनी रुग्ण सुविधेसाठी आयसीयु सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध प्रकल्प
नंदा मार्केटमध्ये भाराणी मेमोरियल क्रिटिकल केअर युनिट साकारण्यात येणार आहे. १३ बेडचे हे हॉस्पिटल आज २५ बेडचे झाले आहे. १५ बेडेड भाराणी मेमोरियल क्रिटिकल केअर युनिट, तसेच टिमटालासह ११ गावांमध्ये संवेदना आरोग्य सेवा प्रकल्प, सेवावस्तीमध्ये संत गाडगेबाबा ग्रामीण आरोग्य सेवा प्रकल्प , शहरातील सेवावस्ती सुविधेसाठी अंबागेटच्या आत रुग्ण सेवा सदन तसेच वैद्यकीय साहित्य केंद्र आहे. दुर्गम भागात ग्रामीण आरोग्या सुविधेसाठी फिरते रुग्णालय , असे बहुविध कल्याणकारी प्रकल्प जनकल्याण सेवा संस्थेचे आहेत. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही सेवा देणारे हे हॉस्पिटल आहे.
या विविध प्रकल्पांसाठी मदतीचा ओघ आवश्यक असून यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments