Home ताज्या घडामोडी परतवाडा येथे भरदिवसा युवकाचा खून

परतवाडा येथे भरदिवसा युवकाचा खून

अमरावती

जिल्ह्यातील परतवाडा शहरात छोटा बाजार परिसरात सोमवारी भररस्त्यात रविनगर परिसरातील रहिवासी असणारा विक्की देविदास पावर या 32 वर्षाच्या युवकाचा अज्ञात इसमांनी दुल खून केला. या घटनेने परतवाडा येथे खळबळ उडाली असून शहरात तणाव निर्माण झाला.

पोलीस घटनास्थळी दाखल घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी लागलीच मृतकास उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल केले. त्यास दवाखान्यात पोलिसांनी मृतावस्थेत आणल्याची नोंद तेथील डॉक्टरांनी घेतली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून परतवाडा शहरातील पंचवीसही पॉईंटवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दंगा नियंत्रण पथकासह शिग्र कृती दल व राखीव पोलीस दल शहरात दाखल झाले आहे. जिल्ह्यातील लगतच्या पोलीस ठाण्यातून स्टाफ बोलाविण्यात आला आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे परतवाड्यात दाखल झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी पी जे अब्दगिरे, ठाणेदार सदानंद मानकर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

पोलिसांनी सद्या आपल्या दप्तरी गुन्ह्याची नोंद केली नसली तरी पोलिसांना या घटनेतील आरोपींची माहिती मिळाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मृतक विक्की देविदास पावर आपल्या मोटरसायकलने छोटा बाजार परिसरातून जात असताना त्या अज्ञात आरोपींसोबत त्याचा वाद झाला. यात आरोपीनी देवीदासच्या मानेवर, डोक्यावर व पोटावर वार केल्या गेलेत.यातच तो घटनास्थळीच ठार झाला असल्याची माहिती आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments