Home विदर्भ प्रा.मोनिका उमक यांनी स्वयंरोजगाराविषयी केले मार्गदर्शन

प्रा.मोनिका उमक यांनी स्वयंरोजगाराविषयी केले मार्गदर्शन

महाराष्ट्र प्रांतिक तेली सभेचे आयोजन

अमरावती

महाराष्ट्र प्रांतिक तेली सभेचे व्हिडियो कॉन्फरंसिंग द्वारे यशस्वीरित्या गुरुवारी आयोजन करण्यात आले होते.. या वेळी स्वयंरोजगार तसेच उद्योग उभारणीविषयी शासनाच्या विविध योजनांबद्दल विनामूल्य मार्गदर्शन करताना प्रा.सौ. मोनिका उमक (संयोजिका,स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान) विशेष मार्गदर्शक केले.

प्रा.मोनिका उमक उद्योग क्षेत्राच्या उभारणी करीता सध्या अमरावती जिल्ह्यत कार्यरत आहे. स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाच्या मध्यातून स्वयंरोजगारच्या चळवळीचं सूत्र त्या साध्य कर्तव्यदक्षतेने सांभाळताहेत. समाजाची उन्नति हे त्यांच्या करीत सर्वोपरी असल्याने त्याकरीता काम करण्यात त्यांना रुचि असल्याचं त्या सांगतात. शिवाय भविष्यात, उद्योग क्षेत्राशी संबंधित असलेल्या कार्यक्रमांना सहकार्य करण्याची तयारी असल्याचंही त्यांनी संगीतलं. कोरोना संकटात असले कार्यक्रम उमेद आणि आशेचा किरण दाखवत असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिल्या. उद्योग क्षेत्राच्या विकासाकरीता शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु या योजनांची आपणास माहिती नसल्याने या योजनांचा लाभ आपण घेऊ शकत नाही. समाजातील सर्व स्तरातील बांधवांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहचावी व या योजनांचा लाभ त्यांना मिळावा, तेली समाज बांधवांची आर्थिक, सामाजिक उन्नती करिता ही वर्च्युअल सभा आयोजित करण्यात आल्याचं यावेळी निमंत्रक सुरेश वंजारी (महाराष्ट्र प्रदेश महासचिव तेली समाज महासभा) यांनी सांगीतलं. कार्यक्रमाला अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे अध्यक्ष मा.जयदत्त अण्णा क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष संध्या। सव्वालाखे, खासदर सुरेश वाघमारे, विक्रांत चांदवडकर, आमदर. शिवाजी चोथवे विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यच्या तेली समाज पदाधीकाऱ्यांकडून तसेच सामान्य जनतेकडून भरघोस प्रतिसाद देण्यात आला.

या कार्यक्रमात करण्यात आलेले मार्गदर्शन केवळ शब्दांमध्ये गूंतून न रहता प्रतेक्षात अवलंबण्याचं आव्हान जनतेला यवेळी करण्यात आलं.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments