Home विदर्भ अंजनगांव सुर्जी येथे वाईन शॉप व कपडा व्यवसायीकावर कारवाई

अंजनगांव सुर्जी येथे वाईन शॉप व कपडा व्यवसायीकावर कारवाई

एकाच दिवशी १३४२०० रुपये दंड वसुली..

अमरावती

संपुर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसायाला बंदी असताना सुध्दा जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील बाजार पेठेत कापडा व्यापारी व इतर व्यावसायिक गिऱ्हायिकांना दुकानाच्या आत मध्ये घेऊन व शटर बंद करून व्यवसाय करीत होते. याबाबतची माहिती नव्याने रुजू झालेले रूजू झालेले तहसिलदार अभिजित जगताप यांना मिळाताच त्यांनी धडक कारवाई करून वाईन शॉप व कापड व्यवसायिकांकडून दंड स्वरूपात एकाच दिवशी 1 लाख 34 हजार 200 रुपये वसूल केले.

शटर बंद दुकानात गिऱ्हाईक

लॉकडाऊन असताना शहरातील दोन प्रसिद्ध कपड्यांची मोठी दुकाने नवरंग ड्रेसेस, माहेश्र्वरी कलेक्शन व कृष्णा साडी सेंटर या मोठ्या दुकानात चोरून व्यवसाय सुरू होता. यांसह काही लहान दुकांनामध्येही गिऱ्हाईक होते. शटर बंद करून व्यवसाय करणाऱ्या या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

असा दिला आर्थिक दंड

तहसीलदार जगताप यांनी लॉकडाऊन असताना दुकान सुरू ठेवणाऱ्या
व्यापाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावला. यात नवरंग ड्रेसेस व माहेश्र्वरी कलेक्शन यांना प्रत्येकी २५ हजार रूपये , कृष्णा साडी सेंटर ला १३ हजार रूपये असा ठोक आकडा असुन शहराच्या मध्यवस्तीतील परकाळे वाईन शॉप शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून दारू विक्री करत असल्याचे स्वता तहसिलदार अभिजित जगताप यांना आढळून आल्याने परकाळे वाईन शॉप ला ४०हजार रुपयाचा दंड देण्यात आला तर इतर काही व्यवसायिकांना नियमाचे उल्लंघन केल्याने दंड देण्यात आला त्यामुळे आज एकाच दिवशी १लाख ३४ हजार २०० रुपयाची दंडात्मक वसुली करण्यात आली.

यांनी केली कारवाई

कारवाई पथकामध्ये तहसिलदार अभिजित जगताप, पोलीस उपनिरीक्षक सपकाळ, नायब तहसीलदार पोटदुखे, नगर पालिका पथकप्रमुख पुरण धांडे, विठोबा घोंगे, मंडळ अधिकारी मिरगे, अविनाश पोटदुखे, गजानन पिंपळकर, तलाठी गवई, पोलिस कर्मचाऱी गोपाल सोळंके, न.प. कर्मचारी दादाराव जंवजांळ,फारुक व इतर कर्मचारी होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments