Home ताज्या घडामोडी तिवसा तालुक्यात तेराशे जिलेटिनच्या कांड्या जप्त

तिवसा तालुक्यात तेराशे जिलेटिनच्या कांड्या जप्त

अमरावती :

ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी तिवसा तालुक्यातील घोटा येथील एका शेतातील गोदामावर छापा टाकू न १३०० जिलेटिनच्या कांड्या, ८३५ डिटोनेटर्स अशी स्फोटके जप्त के ली आहेत. अवैधरीत्या स्फोटके बाळगणाऱ्या आरोपींना देखील जेरबंद करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

मुंबईत स्फोटके आढळून आल्यानंतर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी दहशतवाद विरोधी कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैधरीत्या स्फोटके बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, सुनील के वतकर, संतोष तेलंग, बळवंत दाभणे, श्यामकु मार गावंडे, चंद्रशेखर खंडारे, मंगेश लकडे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तिवसा तालुक्यातील घोटा येथील एका शेतातील गोदामावर सोमवारी छापा घातला.

अशी केलो कारवाई

यावेळी युवराज उद्धव नाखले (४२, रा. घोटा) याला ताब्यात घेण्यात आले. गोदामातून १३०० नग जिलेटिनच्या कांड्या, ८३५ डिटोनेटर्स आणि ब्लास्टिंग यंत्र बसवलेला ट्रॅक्टर असे एकू ण ४ लाख ३५ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

गोदामात होता साठा

ही स्फोटके या गोदामात अवैधरीत्या साठवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे. या स्फोटकांचा कु ठल्याही प्रकारचा परवाना संबंधित व्यक्तीकडे नव्हता. आरोपीची चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने ही स्फोटके इश्वार मोहोड (रा. मार्डी) याने पुरविल्याची माहिती दिली.

पोलीस घेत आहेत शोध
आरोपीला कुऱ्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरोधात स्फोटके कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी अन्य आरोपींचा शोध सुरू के ला आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments