Home ताज्या घडामोडी पेढी धरणावर गळफास घेऊन शेतकऱ्यायाची आत्महत्या

पेढी धरणावर गळफास घेऊन शेतकऱ्यायाची आत्महत्या

अमरावती

पेढी धरणाच्या भिंतीवर गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. वामन महादेव मानकर (७०, रा. वासेवाडी. ता. भातकु ली) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बँकेच्या जाचाला कंटाळून घेतला निर्णय

वामन मानकर यांनी बँके च्या जाचाला कं टाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. धरणात ८ एकर शेतजमीन गेल्यानंतर सरकारकडून अल्प मोबदला मिळाल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.सोमवारी दुपारी काही गावकऱ्यांनी त्यांचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या पेढी धरणाच्या भिंतीवर लटकलेल्या अवस्थेत आढळला.

आमदार राणा यांचा आरोप

वामन मानकर हे भातकुली येथील सेंट्रल बँके च्या शाखेत पैसे काढण्यास गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धट वागणूक दिली व त्रास दिला, यामुळे ते संतप्त झाले होते. आपली ८ एकर जमीन कवडीमोल भावात पेढी धरणात गेली आणि मिळालेल्या अत्यल्प मोबदल्यात आपल्या कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे या विवंचनेत आत्महत्या केली, असा आरोप आमदार रवी राणा यांनी के ला आहे. या घटनेची माहिती मिळताच रवी राणा यांनी तत्काळ वासेवाडी गावात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेस जबाबदार असलेल्या बँक अधिकाºयांच्या विरोधात कडक कारवाई करावी, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी के ली.

जमिनीचा मिळाला अत्यल्प मोबदला

मृत शेतकाऱ्याची ८ एकर जमीन पेढी धरणात गेली असून या जमिनीचा अत्यल्प मोबदला मिळाला, त्यामुळे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा या विवंचनेत ते होते. सातत्याची नापिकी, कर्जबाजारी पणा यामुळे शेतकरी त्रस्त असून मुख्यमंत्र्यांनी आतातरी जागे व्हावे व शेतकऱ्याना न्याय द्यावा अशी मागणी आमदार रवी राणा यांनी यावेळी केली. धरणात जमिनी गेलेल्या शेतकºयांना योग्य तो मोबदला मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही रवी राणा यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments