Home महाराष्ट्र कोविड-१९नंतर होणारा "म्युकरमायकोसिस" काय आहे?

कोविड-१९नंतर होणारा “म्युकरमायकोसिस” काय आहे?

अनुश्री काळे

कोविड-१९ च्या संसर्गातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांना होणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य गंभीर स्वरुपाचा दुर्मिळ आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. पाव किंवा ब्रेडवर आढळणारी ही काळ्या बुरशी प्रमाणे वाढणारी म्युकर नावाची बुरशी मुख्यत: तोंडावाटे नाक, डोळे व जबड्यात आढळून येत आहे. म्युकर प्रजातीचे जीवन चक्र हे विविध अवस्थेमध्ये पुर्ण केल्या जाते. तसेच लक्षावधी बिजाणू या बुरशीत तयार होतात. या सर्व बुरशीचे वर्गीकरण म्युकरोम्यसिटिएस या वर्गामध्ये केले जाते.
म्युकरमायकोसिस या अति दुर्मिळ बुरशीजन्य आजारात रोगाशी लढण्याची नैसर्गिक शक्ती कमी होते. सध्या कोविड-१९मधून बऱ्या झालेल्या किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस चा अधिक धोका संभावतो. मधुमेहाच्या रुग्णांना कोविड-१९च्या उपचारदरम्यान ऑक्सिजन आणि जास्त प्रमाणात स्टीरॉईड दिले जातात. अशाच काहीशा रुग्णांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढतांना दिसत आहे.या आजारात बुरशीचा परिणाम झालेला भाग शस्त्रक्रियेने काढून टाकावा लागतो. म्युकरमायकोसिस चा मृत्यूदर ४०%आहे. अशा रुग्णांंवर उपचार कसे करावे, यासाठी एक आदर्श कार्यप्रणाली म्हणजेच की(एसओपी) विकसित करण्यात येत आहे. या आजाराचे वेळेत निदान न झाल्यास उपचार करणे दुरापास्त होते. विशेष म्हणजे या आजाराबद्दल अजूनही बहुतेक डॉक्टरांमध्ये अनभिज्ञता आहे. यामुळे असे रुग्ण समोर आल्यावर डॉक्टरांनी नक्की काय करावे आणि उपचार पद्धती कशी असावी यासाठी आदर्श कार्यप्रणाली विकसित करण्यात येत आहे.

बाधीत होण्याचे कारणे:- कोविड-१९च्या उपचारा दरम्यान स्टीरॉईड अथवा टोसिलीझुमॅबसारख्या औषधांचा अतिरिक्त वापर.
ऑक्सिजन मशिनचा अतिवापर. किंवा
रोग प्रतिकारशक्ती कमी असणे.

प्राथमिक लक्षणे:-
चेहऱ्याचे स्नायू दुखणे
अर्धशिशी
नाक बंद होणे-सूज येणे
एका नाकपुडीतून रक्तस्त्राव होणे किंवा पाणी गळणे
चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे

एक पापणी अर्ध बंद राहणे
दात दुखणे किंवा हलु लागणे.
या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्यांशी संबंधित लक्षणे दिसतात.

आजाराची लक्षणे:- रुग्णांना डोकेदुखीचा त्रास, दृष्टी कमी होणे या डोळ्यांच्या आजारासह सायनस, तोंडातील वरच्या जबड्यात दुखणे व दातात पस होवुन दात हलणे, नाकातून रक्तमिश्रित पस येणे. नाक बंद होणे आदि म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत.

संसर्ग तोंडावाटे आणि नाकावाटे होत असल्याचे तज्ञांना आढळून येत आहे. म्युकरमायकोसिस चा संसर्गाचा नाकावाटे, तोंडावाटे रुग्णाच्या शरिरात शिरकाव होतो. म्युकरमायकोसिस आजारात सायनसमध्ये तसेच डोळ्यांमध्ये संसर्ग होवुन त्याची तीव्रता मेंदूपर्यंत पोहोचते. बुरशी रक्तवाहिन्यांच्या किंवा मज्जातंतूमधून आत शिरुन रक्तवाहिनीला ब्लॉक करते व तेथील पेशींचा नाश करते यामुळे रुग्णांच्या डोळ्याची दृष्टी जावू शकते तसेच पॅरालिसिसही होवु शकतो.

घ्यावयाची काळजी:- एक डोळा बंद करुन टिव्हीवरील अक्षरे वाचण्याचा प्रयत्न करा, जर दिसणे कमी झाले असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा. रोग प्रतिकारशक्ती संतुलीत होईल यासाठी प्रयत्न करा. म्युकरमायकोसिस या बुरशीच्या प्रसाराचा वेग जास्त आहे त्यामुळे उपचारासाठी टाळाटाळ करु नका रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलीत करा, रक्तदाब नियंत्रित करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्या. कोविड-१९ उपचारादरम्यान अतिरिक्त प्रमाणात स्टीरॉईड आणि ॲन्टीबायोटिकचा वापर झाल्यास रक्तातील सारखेचे प्रमाण वाढते. पर्यायाने रोगप्रतिकारशक्ती कमी होत म्युकरमायकोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. टुथब्रश/मास्क वरचेवर बदलणे. दिवसातून एकदा गुळण्या करणे किंवा वैयक्तीक स्वच्छता ठेवणे.

उपचारासाठीची औषधे:-

बुरशीविरोधी गोळ्या

पोस्कोनॅझोल इंजेक्शन
ॲम्फोटेरिसीन – बी इंजेक्शन

(माइक्रोबायोलाॅजीस्ट)

(7385018125)

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments