Home महाराष्ट्र तिस-या लाटेचा धोका रोखण्यासाठी खबरदारी बाळगणे आवश्यक: ॲड. यशोमती ठाकूर

तिस-या लाटेचा धोका रोखण्यासाठी खबरदारी बाळगणे आवश्यक: ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती

कोविडबाधितांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीत काही प्रमाणात शिथीलता आणली गेली आहे. मात्र साथ अजूनही संपलेली नाही, याचे भान प्रत्येकाने बाळगणे आवश्यक आहे. तिस-या लाटेचा धोका रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगत दक्षता नियम पाळावेत, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्ह्यात लागू संचारबंदीत दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज जारी केला. या आदेशानुसार जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांसह बिगर जीवनावश्यक सेवा मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू नयेत यासाठी प्रत्येकाने दक्षता नियम कसोशीने पाळावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी केले. कोरोना साथीशी गत एका वर्षापासून सातत्याने लढाई सुरु आहे. या काळात पहिल्या लाटेत स्वतंत्र कोविड रूग्णालये, तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, विद्यापीठ व पीडीएमसीमध्ये चाचणी सुविधा याबरोबरच साथ नियंत्रणासाठी लॉकडाऊन आदी प्रतिबंधात्मक उपायही अवलंबण्यात आले. जिल्ह्यात गावोगाव संपर्क, समन्वय व आरोग्यशिक्षणासाठी चार सर्वेक्षणे घेण्यात आली. त्यानंतर लसीकरणाचाही कार्यक्रम हाती घेण्यात आला. दरम्यान, दुस-या लाटेमुळे पुन्हा संचारबंदी आणावी लागली. उपचार सुविधा, जनजागृती, निर्बंध आदींमुळे रुग्ण कमी होत गेले. या संकटकाळात कोविड योद्ध्यांच्या व नागरिकांच्या सहकार्यामुळे प्रत्येक अडचणीवर मात करण्यात आली. मात्र, अजूनही लढाई संपलेली नाही. त्यामुळे काही निर्बंध कायम व काही बाबी शिथील करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होत आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, तिस-या लाटेचा धोका रोखण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे. दुकाने मर्यादित वेळेत सुरु करण्यास परवानगी देताना नियम पाळले जावेत यासाठी दंडात्मक कारवाईचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दंडात्मक कारवाईची वेळच येऊ नये. कोरोनापासून आपले व इतरांचे, तसेच सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती ओळखून सर्वांनी कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आदेशानुसार, किराणा, भाजीपाला, बेकरी, चिकन, मासे आदी दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बिगरजीवनावश्यक एकल दुकानेही (मॉलमधील नव्हे) शनिवार व रविवार वगळता सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरू राहतील. उपाहारगृहांनाही सकाळी 11 ते 7 या वेळेत घरपोच सेवेची परवानगी देण्यात आली आहे. रास्त भाव दुकानेही सकाळी 7 ते 3 सुरू राहतील. नागरिकांना दुपारी 3 नंतर वैद्यकीय कारण व इतर आवश्यक कारणांशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे. कृषी बाजार समित्या व त्यांचे बाजार सुरु राहतील, तसेच कृषी सेवा केंद्रे सकाळी 7 ते दुपारी 3 सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांना 25 टक्के कर्मचारी उपस्थितीसह काम करता येईल. बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस त्यांच्या वेळेत सुरु राहील. दवाखाने व औषधालये पूर्णवेळ सुरु राहतील.

सीमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून कोविड निगेटिव्ह रिपोर्ट नसलेल्या वाहनधारकांना प्रवेश नाकारण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आले आहेत. आपत्कालीन व वैद्यकीय कारणांसाठी वाहनांना परवानगी आहे. मालवाहतूक पूर्णवेळ सुरु राहील.

सर्व प्रकारच्या व्यापारी संघटना, नागरिक यांनी जास्तीत जास्त घरपोच सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. *दंडाची तरतूद*

सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क न लावल्यास 750 रुपये दंड, दुकानांत सोशल डिस्टन्स न पाळल्यास दुकानदारांना 35 हजार दंड व मंगल कार्यालयात लग्नसमारंभ आयोजित केल्यास 50 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. साथ नियंत्रणाबाबत दर शनिवारी आढावा घेऊन आवश्यक तिथे निर्बंध लागू किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 000

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments