Home विदर्भ समर्थ विद्यालयात ५ वी प्रवेशअर्ज वितरण सुरू

समर्थ विद्यालयात ५ वी प्रवेशअर्ज वितरण सुरू


अमरावती
स्थानिक शिक्षण क्षेत्रात नामवंत असलेल्या श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाचव्या वर्गाच्या प्रवेशअर्जांचे वितरण आजपासून सुरू झाले आहे .
३१ मेपर्यंत लाॅकडाऊनचे निमित्य करून चौथी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व टीसींचे वितरण बऱ्याच प्राथमिक शाळांनी थांबऊन ठेवल्याने ५ वा वर्ग प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले होते.गेल्या दोनतीन दिवसात काही प्राथमिक शाळांनी चौथी इयत्ता उत्तीर्णच्या गुणपत्रिका व टीसीचे वितरण सुरू केल्याने श्री समर्थ विद्यालयाने पाचवा वर्ग प्रवेशाचे अर्ज आजपासून खुले केले.
शाळा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ विद्यालयात ५ वी च्या एकूण २६० जागा असून त्यातील २३५ जागा जाती व संवर्गनिहाय आरक्षणासह भरल्या जातात तर २५ जागा वयवस्थापन कोट्यातून भरल्या जातात. प्रवेश प्रक्रियेतील टप्प्यांनुसार दि. १५ जूनपर्यंत अर्ज वितरण व अर्ज स्विकारण शाळेमध्ये सकाळी ११ ते २ या कालावधीदरम्यान सुरू राहील.
१५ तारखेनंतर आवश्यकतेनुसार प्रवेशाच्या जाती व संवर्गनिहाय लाॅटरी सोडती काढल्या जातील.
प्रवेशअर्ज शाळेत सादर करतेवेळी प्रवेशअर्जाला प्रवेशोत्सुक विद्यार्थ्याची चौथ्या इयत्तेची गुणपत्रिका ,टीसी, आधारकार्ड तसेच जात- संवर्ग आरक्षण हवे असल्यास विद्यार्थी किंवा पालकाचे जात प्रमाणपत्र या चार महत्वाच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडाव्या लागतील. प्रवेश सोडतीचा कार्यक्रम १० जूनच्या सुमारास जाहीर केला जाईल असे समर्थ विद्यालयाच्या सुत्रांनी सांगितले. सिबलिंग प्रवेशाच्या नियमानुसार समर्थ विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भावंडांना ५ व्या वर्गात थेट प्रवेश देण्यात येतो , या नियमांतर्गच्या सिंबलिंग प्रवेशांची सुरूवात शाळेने केली आहे.
पालकांनी प्रवेशअर्जांसाठी शाळेत येतांना कोविड प्रतिबंधक नियमांचे कटाक्षाने पालन करावे असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे. मास्कशिवाय शाळेत प्रवेश मिळणार नाही असेही कळविण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments