Home ताज्या घडामोडी हॉटेच्या वरून इसम पडला; जागीच ठार

हॉटेच्या वरून इसम पडला; जागीच ठार

अमरावती

नवाथे नगर चौक स्थित हॉटेल रंगोली पर्लच्या पाचव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. सुनिल अमृत सोळंके (47 रा. शोभानगर) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे नवाथे चौक परिसरात खळबळ उडाली.

पाचव्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळला

हॉटेल रंगाली पर्लच्या पाचव्या मजल्यावर लोखंडी शेडचे काम सुरु असून, या कामाचा कंत्राट शत्रुज्ञ विघे यांच्याकडे आहे. शुक्रवारी सकाळी लोखंडी शेडला वेल्डींग मारण्याचे काम सुरु होते. दरम्यान काम करताना सुनिल सोळंकेचा तोल गेल्याने तो थेट पाचव्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तेथे उपस्थित अन्य कामगारांनी तत्काळ सुनिलला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरने सुनिल सोळंकेला मृत घोषीत केले.

सुरक्षेकडे दुर्लक्ष

पाचव्या मजल्यावर शेडचे काम करताना कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेविषयी काळजी घेण्यात आली नव्हती. कंत्राटदार व हॉटेल मालकाने सुध्दा कामगारांच्या सुरक्षीततेविषयी उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळेच कामगाराचा खाली पडून मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला होता. यासंदर्भात राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments