Home महाराष्ट्र संत गाडगे महाराजांना 'भारतरत्न' देण्याची खा. संभाजीराजेंकडे मागणी

संत गाडगे महाराजांना ‘भारतरत्न’ देण्याची खा. संभाजीराजेंकडे मागणी

अमरावती

खासदार संभाजीराजे भोसले हे सध्या विदर्भात त्यांच्या जनसंवाद दौऱ्यामध्ये असताना त्यांनी संत गाडगे महाराज वृध्दाश्रम वलगांव येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी वृध्दाश्रमातील वृध्दांशी संवाद साधून वृध्दाश्रममध्ये सुरू असलेल्या सामाजिक कार्याबद्दल वृध्दाश्रमाचे संचालक डॉ. कैलास बोरसे यांचे कौतूक केले.

या भेटीदरम्यान संचालक डॉ. कैलास बोरसे यांनी छ. संभाजीराजेंना निवेदन देऊन संत गाडगे महाराजांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यासाठी तसेच स्वच्छ भारत अभियानाचे नामकरण ‘संत गाडगे महाराज स्वच्छ भारत अभियान’ करण्यात यावे यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.

गाडगे बाबांनी आपल संपुर्ण आयुष्य जनसेवेसाठी व्यतित केल, जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे ‘खराट्याचे बादशाह’ म्हणून गाडगे बाबांना पाहील जात. त्यामुळे गाडगे बाबांच्या विचारांना जगभरात उजाळा मिळावा या उद्देशाने त्यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा आणि यासाठी खा. संभाजीराजे भोसले यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती या निवेदनातून डॉ. कैलास बोरसे यांनी केली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments