Home ताज्या घडामोडी शिवसेनेचा सत्यानाश !

शिवसेनेचा सत्यानाश !

नवनीत राणा यांची उमेदवारी अनधिकृत आहे. त्यांचे जाती प्रमाणपत्र खोटे आहे.बस…. या एका विषयापलीकडे काही वेगळे जगात अस्तित्वात आहे याकडे अमरावतीच्या शिवसैनिकांना विश्वासच नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून नवनीत राणा यांच्या जातीच्या मागे भरकटलेल्या अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिकांना कशाचेही भान नाही. बरं या सर्व उठाठेवी केवळ आणि केवळ शिवसेनेचे मोठे नेते अशी ओळख असणाऱ्या आनंदराव अडसूळ यांना अगदी सोप्या पद्धतीने आरामात लोकसभा निवडणूक जिंकता यावी यासाठी. 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या अडसुळांचा अमरावतीशी काही एक संबंध नव्हता. अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या अमरावती लोकसभा मतदार संघात 2009 मध्ये आनंदराव अडसूळ निवडून आले आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे वाघ म्हणविणाऱ्यांचा अनेकांचा शिवसेनेशी संबंधच तुटला हे वास्तव अनेकांना माहिती आहे. आज राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत. त्यांचे पुत्रही कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र अमरावती माझे आजोळ आहे असे निवडणूक काळात प्रत्येक भाषणात सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या आजोळी शिवसेनेचा दरारा शोधूनही सापडणे कठीण. जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हा प्रमुख आहे. त्याच्या मागे मात्र चार शिवसैनिकाही नाहीत अशी परिस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी एकही उमेदवार निवडून न येणे हे खरं तर जिल्ह्यात शिवसेना किती दुबळी आहे हे स्पष्ट करते.
अगदी खरं सांगायचं तर शिवसेनेपेक्षा अडसुळांच्या प्रेमात शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे या वाघाने स्थापन केलेल्या पक्षाला बट्टा लावला आहे. नवनीत राणा यांच्या जातीच्या विषयात न्यायालयाने काही निर्णय आला तरच जिल्ह्यातील शिवसैनिक एकत्र येतात, फटाके फोडतात, नाचतात, उड्या मारतात आणि अडसुळांना खुश करतात. आता सांगा, बस हे असं केल्याने शिवसेनेचे संघटन बळकट होणार का खरंच?
बडनेराचे आमदार रवी राणा यांनी शिवसैनिकांची पंढरी असणाऱ्या मातोश्रीसमोर बेशरमचे झाड लावणार असा इशारा दिला. आमदार राणा यांनी हा इशारा देताच जिल्ह्यातील शिवसैनिक राणा यांना विकले गेले आहेत त्यामुळेच सारे घरात दडून आहेत अशा स्वरूपाचा संदेश व्हॉट्सअप वर व्हायरल झाला. खरं तर या अशा संदेशाचा फारसा परिणाम होणार दिसत नाही. कदाचित हा संदेश अमरावतीच्या शिवसैनिकांची वास्तविकता मांडणारा असावा. अगदी खरं बोलायचं तर आनंदराव अडसूळ सारख्या मोठ्या नेत्याने 2014 ते 2019 या काळात नवनीत राणा यांच्या जातीच्या विषयाला जितके महत्व दिले त्यापवक्षा पूर्ण नव्हे मात्र केवळ पाच- दहा टक्के लक्ष जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्न, विकासाचे मुद्दे आणि बाप माणूस म्हणून शिवसैनिकांमधील वाद तंटे सोडविण्यासाठी दिले असते तर नवनीत राणा या खसदार झाल्याचं नसत्या. शिवसेनेच्या वाघाने नवनीत राणांचा इतका धसका घेतला की त्यापायी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचा अगदी सत्यानाश झाला आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments