Home ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यत अतिवृष्टी; नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करा

अमरावती जिल्ह्यत अतिवृष्टी; नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करा

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला आदेश

अमरावती

जिल्ह्यात काही ठिकाणी अतिपावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

अमरावती तालुक्यात शिराळा, ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन तसेच इतर काही परिसरात अतिपावसामुळे पीकनुकसान व इतर हानी झाली आहे. या नुकसानाबाबत
दक्षतापूर्वक व तपशीलवार पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी दिले आहेत.

जिथे नुकसान झाले असेल त्याठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पोहोचून पंचनामे करावेत. गावात शेतकरी बांधवांशी संवाद साधून परिपूर्ण माहिती घ्यावी व सर्व क्षेत्राची पाहणी करावी. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पंचनामे अचूक व सविस्तर करावेत. ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी बांधव भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
अमरावती तालुक्यात शिराळा, ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन आदी परिसरात अतिपाऊस झाला. याबाबत प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments