Home ताज्या घडामोडी सरळ खरेदी प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह निधी मिळवून द्यावा : बच्चू कडू

सरळ खरेदी प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह निधी मिळवून द्यावा : बच्चू कडू

अमरावती

सरळ खरेदी प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह निधी मिळवून देण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले. येथील जलसंपदा विभागाच्या सिंचनभवन येथे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत बैठक जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सु. अ. राठी, भुसंपादन अधिकारी वर्षा पवार, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांच्यासह विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध प्रकल्प निर्मिती होत असताना अनेकांच्या जमीनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शेतकरी, गावकरी बांधवांनी जमीनी दिल्या म्हणूनच प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला संबंधित विभागाकडून प्राधान्याने मिळाला पाहिजे. परंतू, सरळ खरेदी प्रकरणातील काही प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत मोबदला मिळाला नाही. तशी निवेदनेही जलसंपदा विभागाला प्राप्त झाली आहेत. त्यामुळे यासंबंधी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले. सरळ खरेदी प्रकरणातील लाभार्थ्यांना कोकण विभागातील अरुणा प्रकल्प, वर्धा प्रकल्प तसेच सोफिया मॉडेलमध्ये ज्याप्रकारे मोबदला अदा करण्यात आला त्याचा अभ्यास करुन सर्व संदर्भ नमूद करुन त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी बैठकीत दिले. येत्या पंधरा दिवसात ही कार्यवाही पूर्ण करुन कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर रहाटगाव स्थित सकाळ ॲग्रोवन मार्टचे उद्घाटनही राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments