Home ताज्या घडामोडी बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सजगता आवश्यक : पोलीस अधिक्षक हरी बालाजी

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सजगता आवश्यक : पोलीस अधिक्षक हरी बालाजी

■ पालकांनी घ्यावयाची काळजी
● विश्वास नसलेले ठिकाण किंवा व्यक्तीबरोबर तुमच्या मुलाला एकटे सोडू नका
● बालकांशी संवाद ठेवा. त्यांच्या
वागण्या-बोलण्यात बदल जाणवला तर त्यांच्याशी लगेच बोला. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या.
● त्यांच्याबरोबर हिंसा किंवा लैंगिक शोषण झाल्यास त्यात त्यांची काहीही चूक नाही, हे बालकांना सांगा.
● योग्य व अयोग्य स्पर्शाबाबत मुलांना मातेने माहिती द्यावी.

अमरावती

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी बालकांना योग्य व अयोग्य स्पर्शाची माहिती देणे, पालक व शिक्षक यांनी सजग राहून बालकांशी सुसंवाद ठेवणे आवश्यक असल्याचे पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांनी सांगितले.

याबाबत जारी केलेल्या व्हीडिओ संदेशात श्री. बालाजी म्हणतात की, आपल्या अवतीभवती समाजात लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ही गंभीर समस्या आहे. सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर अनेकदा परिचितांकडूनही अत्याचार घडतात. त्यात अल्पवयीनांवर बलात्कार, शरीराला घाणेरडा स्पर्श करणे किंवा अवयवाचा भाग नग्न करणे, तसे करण्यास भाग पाडणे, अश्लील व्हीडिओ दाखवणे किंवा तयार करणे असे प्रकार घडतात. मुलांना अशा बाबींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यात जाणीवजागृती करणे आवश्यक असते. मुले एकलकोंडी होता कामा नयेत. त्यांचे मानसिक भावविश्व जपण्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद ठेवला पाहिजे.
एखादी व्यक्ती घाणेरडे वर्तन करत असेल तर त्याला वेळीच विरोध करण्याचा आत्मविश्वास बालकांमध्ये जागविला पाहिजे. अशा घटना झाल्यास किंवा तसे आढळल्यास पोलिसांना १०० किंवा चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments