Home ताज्या घडामोडी दिव्‍यांगांचा वकास आराखडा तयार करा : ना. बच्चू कडू

दिव्‍यांगांचा वकास आराखडा तयार करा : ना. बच्चू कडू

अमरावती

अमरावती महानगरपालिका अंतर्गत दिव्‍यांगांच्‍या मागण्‍याबाबत आढावा घेण्‍याकरीता जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार विभागाचे मा.राज्‍यमंत्री बच्‍चु कडु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गुरुवार दिनांक २२ जुलै,२०२१ रोजी दुपारी २.०० वाजता अमरावती महानगरपालिका येथे सभा आयोजित करण्‍यात आली होती. या सभेमध्‍ये महापौर चेतन गावंडे, आमदार सौ.सुलभाताई खोडके, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, उपआयुक्‍त सुरेश पाटील, उपआयुक्‍त रवि पवार, अधिकारी, प्रहार संघटनेचे पदाधिकारी चंदु खेडकर, दिपक भोंगाडे, राहुल पाटील, राज्यमंञ्यांचे विशेष कार्य अधिकारी संजय कडु, राज्यमंञ्यांचे संपर्क अधिकारी अतुल हंबर्डे, बंटी रामटेके, कार्यकर्ते, दिव्‍यांग, उपस्थित होते. या सभेमध्‍ये दिव्‍यांगांच्‍या प्रलंबित मागण्‍याबाबत सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली.

मा.राज्‍यमंत्री यांनी या बैठकीत दिव्‍यांगांचा घरोघरी सर्व्‍हे करुन त्‍यानुसार विकास आराखडा तयार करावा व दिव्‍यांगांच्‍या आवश्‍यकतेनुसार विविध सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी. दिव्‍यांगांचे बचत गट तयार करुन गटांना मनपा व जिल्‍हा उद्योग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आर्थिक मदत करुन व्‍यवसाय करण्‍यास मदत करावी.

या सभेमध्‍ये ज्‍या दिव्‍यांगांकडे घर नाही आहे त्‍यांच्‍यासाठी शासकीय जागा निर्धारित करुन घरकुल योजना राबवून दिव्‍यांगांना विनाअट घरकुल देण्‍याच्‍या विषयाबाबत स.नं.५५/१ व मौजा बडनेरा स.नं.९४ येथील जागेची निवड करण्‍यात आली असून या ठिकाणी ३९९ घरे बांधण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. दिव्‍यांगांना सरसकट पेंन्‍शन योजना लागू करण्‍याच्‍या अनुषंगाने मतीमंद, कुष्‍ठरोगी, वयोवृध्‍द दिव्‍यांगांना वार्षिक ६००० रुपये पेंन्‍शन देण्‍यात येत होती ती आता ९००० रुपये करण्‍यात आली आहे. ज्‍या दिव्‍यांगांना व्‍यवसायासाठी जागा दिल्‍या आहे त्‍यांना दिव्‍यांग ५ टक्‍के निधीतून करारनाम्‍यांचे पैसे खर्च करुन त्‍यांचे करारनामे करुन देण्‍याबाबत कार्यवाही प्रस्‍तावित करण्‍यात आली आहे. महानगरपालिका अमरावती मार्फत सर्व लसीकरण केंद्रावर दिव्‍यांगाकरीता स्‍वातंत्र व्‍यवस्‍था जसे लसीकरणाबाबत जागेवर नोंदणी लसीकरण बसण्‍याची स्‍वातंत्र व्‍यवस्‍था पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असुन प्रत्‍येक लसीकरण केंद्रावर दिव्‍यांग बांधवाकरीता प्रति लसीकरण केंद्र १० डोजेस राखीव ठेवण्‍यात आलेले असुन लसीकरणाकरीता येणा-या दिव्‍यांग बांधवांना रांगेमध्‍ये उभे ठेवण्‍यात येऊ नये याबाबत सुचना सर्व लसीकरण केंद्राला देण्‍यात आले आहे. तसेच दिनांक ५/०७/२०२१ रोजी लसीकरण केंद्र महेद्र कॉलनी याठिकाणी दिव्‍यांग बांधवाकरीता विषेश लसीकरण सत्राचे आयोजन करण्‍यात आले होते. मनपा कार्यक्षेत्रातील अतिदिव्‍यांग बांधवांचे शहरी आरोग्‍य केद्रांचे आशा वर्कस यांच्‍या मार्फत सर्वेक्षण करण्‍यात येत असुन त्‍यांच्‍याकडुन यादी प्राप्‍त झाल्‍यानंतर अतिदिव्‍यांग बांधवांना त्‍यांच्‍या घरी जाऊन लसीकरण करुन देणेबाबतचे कार्यवाही करण्‍यात येईल.

सन २०२०-२१ मध्‍ये मा.आयुक्‍त, दिव्‍यांग कल्‍याण, पुणे यांच्‍या निर्देशानुसार लॉकडाऊन काळात अमरावती शहरातीलनोंदणीकृत दिव्‍यांग लाभार्थ्‍यांकडुन प्राप्‍त ऑनलाईन माहितीच्‍या आधारावर दिव्‍यांग ५ टक्‍के निधीमधुन दिव्‍यांग लाभार्थ्‍याना धान्‍य व आवश्‍यक वस्‍तु खरेदी करण्‍याकरीता प्रत्‍येकी १००० रुपये एकुण ९८९ दिव्‍यांगांना देण्‍यात आले आहे. सन २०२१-२०२२ मध्‍ये शासनाकडुन वरील प्रमाणे आदेश प्राप्‍त झाल्‍यास याबाबत कार्यवाही करण्‍यात येईल.

सन २०२१-२०२२ मध्‍ये दिव्‍यांग कल्‍याण ५ टक्‍के राखीव निधी दिव्‍यांगांचे कल्‍याणाकरीता पुर्ण खर्च करण्‍याबाबत कार्यवाही सुरु आहे.

वडाळी परिक्षेत्रातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाकरीता पात्र १५६ प्रकरणे मंजुर केली असुन कार्यवाही प्रगतीत आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments