Home ताज्या घडामोडी पालकमंत्र्यांकडून अमरावती तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

पालकमंत्र्यांकडून अमरावती तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

पूर संरक्षणासाठी भरीव उपाययोजना आवश्यक: यशोमती ठाकूर

अमरावती

अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून देण्याबरोबरच पूर संरक्षणासाठी भरीव उपाययोजना करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्ह्यात गत आठवड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून दौरे होत आहेत. पालकमंत्र्यांनी आज अमरावती तालुक्यातील देवरी, देवरा (शहिद), ब्राम्हणवाडा भगत, शिराळा आदी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रत्येक गावात झालेल्या हानीचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला व ग्रामस्थांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे आदी उपस्थित होते.

घरांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेनुसार शिराळा येथे २१३ घरांचे नुकसान झाले. तेथील काही नोंदी घेण्याचे राहिल्याचे नागरिकांचे म्हणणे लक्षात घेऊन, तातडीने त्या नोंदी घ्याव्यात. पंचनामे करताना सविस्तर व प्रत्येक नुकसानीची नोंद घ्यावी. एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

फाजलापूर व देवरा येथील शेतात नाल्याचे पाणी घुसून नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी.
अतिवृष्टीमुळे होणारी हानी लक्षात घेता बांध, नदी खोलीकरण आदी पूर संरक्षणासाठी भरीव उपायोजना करण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

अतिवृष्टी उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा

अतिवृष्टी उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उद्या (२४ जुलै) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments