Home ताज्या घडामोडी अमरावतीत ऑक्सिजन पार्कचे यशोमती ठाकुरांच्या हस्ते लोकार्पण

अमरावतीत ऑक्सिजन पार्कचे यशोमती ठाकुरांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती

युनायटेड नेशन्सने चालू दशक हे जैवविविधता संवर्धन दशक म्हणून घोषित केले आहे. शहरात डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरात असलेल्या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण आहे. जैवविविधता जोपासणारा हा ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

शहरातील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, सामाजिक वनसंरक्षक डी. पी. निकम, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, शहरातील पाच एकराचे वनक्षेत्र तिथे झाडे नसल्याने रुक्ष झाले होते. डम्पिंग ग्राऊंडसारखा त्याचा वापर होत होता. वनविभागाच्या माध्यमातून या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर झाले आहे. शहर सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच पर्यटकांसाठीही एक महत्वाचे आकर्षणस्थळ निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांलगतच्या मोकळ्या वनजमिनींवर अशी वनोद्याने निर्माण करण्यासाठी वनविभागाने नियोजन करावे व अशा कामांना गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

सावली व प्राणवायू देणा-या झाडांचे उपवन

ऑक्सिजन पार्कमध्ये वड, पिंपळ, निम व बिहाडा या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे उन्हाळ्यातही हरित राहून सावली, तसेच जास्तीत जास्त प्राणवायू देतात.
ऑक्सिजन पार्कमध्ये बांबूचेही स्वतंत्र रोपवन तयार करण्यात आले असून, त्यातून जाणारी वाट व पूलाची निर्मिती करण्यात आली आहे.

बालकांसाठी स्वतंत्र उद्यान
बाळगोपाळांसाठी स्वतंत्र उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून, तिथे विविध खेळणीही उपलब्ध आहेत. पार्कच्या सर्व क्षेत्राचे निरीक्षण करता यावे यासाठी निरीक्षण मनोराही उभारण्यात आला आहे. कॅक्टसच्या विविध प्रजातींची लागवड करून कॅक्टस व रॉक गार्डनही उभारण्यात आले आहे.

वनजीवनाची माहिती देणारे फलक
वन्यप्राणी व पक्ष्यांची छायाचित्रे असलेले माहितीफलकही उद्यानात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments