Home ताज्या घडामोडी दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाच्या जागेची पालकमंत्र्यांकडून पाहणी

दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाच्या जागेची पालकमंत्र्यांकडून पाहणी

स्मारकासाठी आवश्यक निधी मिळवून देऊ
काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावती

माजी राज्यपाल, दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी नियोजनानुसार आवश्यक निधी मिळवून देण्यात येईल. हे काम गतीने पूर्ण होण्यासाठी प्रशासनानेही कामांना वेग देण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

येथील विद्यापीठ परिसरातील स्मारकाच्या कामांची पाहणी पालकमंत्र्यांनी आज सकाळी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोटांगे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दिवंगत दादासाहेब गवई यांचे राजकीय, सामाजिक पटलावरील कर्तृत्व हे देशपातळीवरील होते. भूमिहीनांचा सत्याग्रह,मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीचे ते अग्रणी नेते होते.अमरावती जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व तसेच, ते केरळ,बिहार आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपालही होते.त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक व्हावे ही अमरावतीकरांची इच्छा लवकरच पूर्णत्वास येईल. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही पालक मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

पूर्णाकृती पुतळा, सभागृहाचे नियोजन
स्मारकासाठी नगरविकास विभागाकडून 20 कोटी 3 लक्ष रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्मारकात दादासाहेब गवई यांचा पुर्णाकृती पुतळा, जीवनपट दर्शविणारे स्मृती सभागृह, कॅफेटेरिया, दोनशे क्षमतेचे प्रेक्षागृह, आवारभिंत, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते व सौंदर्यीकरण, वाहनतळ आदी कामे होणार आहेत. ही सर्व कामे नियोजनानुसार दर्जेदार व वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. कामांसाठी आवश्यक निधी वेळोवेळी पाठपुरावा करून मिळवून देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील कामांसाठीचा उर्वरित निधीही तत्काळ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. निधीची कमतरता पडू देणार नाही. काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
                       

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments