Home महाराष्ट्र संभ्रमित पालक

संभ्रमित पालक


कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे आपण त्यावर तुटून पडल्या सारखे वागत आहोत हा भाग वेगळा. लग्नं समारंभ ,हॉटेलिंग, पिकानिक, छोटे मोठे कार्यक्रम आपले ,आपले.आपल्या , आपल्या पद्धतीने सुरू आहे. यात काही लोक थोडीफार कळजी घेतात. तर काही बिनधास्त….
यातच महत्त्वाचा विषय आहे तो शाळा सुरू करण्याचा,सद्या ऑनलाईन शाळा सुरू आहे. पण शासनाने मान्यता दिल्यामुळे शाळा ऑफलाईन सुरू करण्याची चर्चा सुरू झाली .आणि यात पालकांची संभ्रमाची भूमिका पाहायला मिळत आहे.तसही सद्याचा एस सी ई आर टी च्या ऑनलाइन सर्वेक्षणावरून लक्षात येते की शाळेत पाठवायला तयार असलेल्या पालकांचे प्रमाण ८३.९७% तर शाळेत पाठण्यास तयार नसलेल्या पालकांचे प्रमाण १६.०३% येवढे दिसून आले.हा झाला पालकांचा सर्वे. पण आपल्या पाल्याची काय मानसिक तयारी आहे हे आजुन आपण पहले नाही. कारण या ऑनलाईन शाळे मध्ये त्यांनी खूप मज्जा करून घेतली.त्यांना घरात बसून अभ्यास करणे.किंवा मोबाईल वर असणे ..याची सवय झाली आहे. आपण नाही का मागील वर्षी घरी होतो आणि मग ऑफिस मध्ये ,किंवा आपल्या कामावर जायचं आपल्या जीवावर येत होत. तसच या दोन वर्षात या मुलांनाच झाल नसेल कशावरून…. ? ही मुलं जेव्हा घरात होती तेव्हा त्यांचा त्याच्या मना प्रमाणे कारभार चालायचा मला क्लास जॉईन करायचा की नाही कार्याचा, इत्यादी स्वातंत्र्य त्यांना होतं हे स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावल्या जाणार असल्याची त्यांची भीती समोर येताना दिसते त्यांना वाटते की मी घरूनच क्लासेस करणार कशाला शाळेत जायचं यावरून त्यांची रडारड सुरु होऊ शकते ,याचे शाळेत न जाण्याची अनेक कारणे ते आपल्याला देतील यामध्ये काहींना खरंच एकटं राहायची सवय झालेली असल्यामुळे, काहींना कोणासोबत बोलण्याची भीती वाटत असल्यामुळे ,एखाद्या घटनेला सामोरे जाणे त्यांना कठीण होणार याची जाणीव झालेली दिसून येवू शकते, एखादे मूल हट्टी झाले असेल तर ते घराच्या बाहेरही जायला तयार नसतं या सगळ्या गोष्टींचा वेध घेणं पालकांची जबाबदारी झालेली आहे सध्या मुलं-मुली मोबाईल मुळे सोशल मीडियाच्या दुनियेत वावरत आहेत, हे जग त्यांना अगदी जवळ वाटतं परंतु प्रत्यक्ष अनुभवताना करावी लागणारी तडजोड त्याचा अंदाज त्यांना करून देणे गरजेचे झालेले आहे, काही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत, कारण मुलांना चार ते पाच तास मास्क घालून वावरावं लागणार त्यामुळे त्यांना होणारा त्रास तसेच शाळेच्या स्वच्छतेवर चा त्यांचा विश्वास, काही मुलांची प्रतिकारशक्ती आधीच कमी असल्यामुळे त्यानवअसलेली भीती इत्यादी अनेक गोष्टी आहेतच, परंतु या सर्वांना समोर जाऊन या सर्वांचे आव्हान स्वीकारून आपण आपल्या पाल्याला शाळेत पाठवायला तयार आहोत. परंतु आपला पाल्य तयार आहे का त्यांची मनस्थिती काय आहे यावर घरात संवाद होणं गरजेचं आहे. मी नेहमी हेच म्हणत असते की आपण आपल्या पल्या सोबत जेवढ्या जास्त गप्पागोष्टी कराल संवाद साधाल त्यांच्या मतांना स्थान द्याल त्यांची आवड-नावड समजून घ्याल, तेवढं मूल परिपक्व आणि समजूतदार बनत असतं. त्यांची मानसिक तयारी आपण करून घ्यायला पाहिजे नाहीतर मुलांच्या सततच्या ऑनलाईन असल्यानं मित्र-मैत्रिणींसोबत जास्त बोलतात म्हणून त्यांचा मोबाईल काढून घेतल्यान, त्यांचा मोबाईल एका विशिष्ट तोऱ्यात चेक करण्यान …त्यांचा मनस्ताप वाढतो . त्यांच्यासाठी हे खुप अपमानास्पद असतं म्हणून आपल्या पाल्याला गमवायचं नसेल तर त्यांना वेळ द्या. चर्चा करा संवाद साधा. मुलांना आपलंसं करा .आणि शाळेला जाण्याकरिता त्यांची मानसिक तयारी करून घ्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या.आपल्याकडून काही चूक झाली असेल तर ती त्यांच्यासमोर मान्य करा. मुलांना त्यांच्या वयानुरुप वागणूक द्या. त्यांची खूप म्हणजे अति काळजी करू नका. की मुलं आपल्यावर अवलंबून राहतील त्यांच्या संपूर्ण गरजा पूर्णपणे पूर्ण करणे हानिकारक असते. ्यामुळे ते हट्टी बनतात आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांची दुसर्‍या मुलांसोबत तुलना करू नका. त्यामुळे ते अपमानित होत असतात. आणि त्यांचा आत्मविश्वास खचत जातो. तेव्हा मुलांची तुलना न करणे केव्हाही चांगले. मुलांनी चूक स्वीकारली असेल तर त्याला शिक्षा करू नका. नाहीतर त्याचा ठाम विश्वास बनतो की, चूकमान्य नाही केली तरी शिक्षा होणार, आणि मान्य केली तरी शिक्षा होणार, म्हणून चूक मान्य न करता तो शिक्षा भोगायला तयार होत असतो. पालक म्हणून आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपला पाल्य हा समंजस नागरिक बनेल यात काहीही शंका नाही
इवले से रोप लाविले दरी
त्याचा वेलू गेला गगनावरी

सुचिता बर्वे

८०८७१५९३९६

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments