Home ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावती
जिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा यांनी राज्य शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.

पुसदा,देवरा,देवरी,रोहनखेडा, नांदुरा लष्करपूर,अंतोरा,ब्राह्मणवाडा भगत,आधी गावात पुराचे पाणी घुसून प्रचंड नुकसान, शेती पाण्याखाली,घराघरात पाणी घुसले,गुरेढोरे वाहून गेली ही विदारक दृश्य पाहून खासदार नवनीत राणा गहिवरल्या.

टेंबा बॅरेज प्रकल्पात समाविष्ट 13 गावे 2007 पासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत 60 टक्के खरेदी बाकी असल्यामुळे व शासनाच्या लेखी सदर गावे बुडीत क्षेत्रात असल्यामुळे या गावातील नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. गावकऱ्यांचा समोर खासदार नवनीत राणा यांनी जिल्‍हाधिकारी श्रीमती पवणीत कौर यांना फोन लावून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. याभागात तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

गत काही दिवसापासून अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला. तिवसा मतदार संघातील या भागात टेंबा बॅरेज प्रकल्प ज्याला 2700 प्रशासकीय मान्यता असून जमीन 40 टक्के खरेदी झाल्या असून उर्वरित 60 टक्के खरेदी बाकी आहे त्यामुळे शासन दरबारी हे क्षेत्र बुडीत असून याठिकाणी विकास कामांना खीळ बसली आहे. दोन हजार गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आपण या प्रकरणात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर या समस्येचे निराकरण करून असे अभिवचन नवनीत रवी राणा यांनी गावकऱ्यांना दिले.

अमरावती जिल्ह्यात पंतप्रधान ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत करण्यात येणारी रस्ते व पुलांच्या कामात तांत्रिक चुका असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली असता खासदार नवनीत रवी राणा यांनी तात्काळ या विभागाचे कार्यकारी अभियंता खान यांना भ्रमणध्वनी वरून सर्व कामांची स्थळ पाहणी करून चुका दुरुस्त करण्याचे व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

या गंभीर आपत्तीत आपण गावकऱ्यांच्या पाठीशी असून शासकीय पातळीवर पाठपुरावा करून सर्व आपदग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे खासदार नवनीत रवी राणा यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments