Home ताज्या घडामोडी अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात

अमरावती

दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे साडेतीन कोटी रुपये राजापेठ पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास फरशी स्टॉप परिसरात करण्यात आली. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

नीलेश भरतभाई पटेल (२७) रा. फरशी स्टॉप, जिग्नेश राजेश गिरीगोसावी (२६), शिवदत्त महेंद्र गोहील (३०), वाघेला सिलुजी जोराजी (४९), रामदेव बबादुरसिंग राठोर (२४) व नरेंद्र दिलीपसिंग गोहील (२७) सर्व रा. गुजरात अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. फरशी स्टॉप येथून आज सकाळी दोन चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात हवालाची रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी फरशी स्टॉप परिसरात सापळा रचला. यावेळी चारचाकी वाहन क्रमांक एमएच १८ बीआर १४३४ व एमएच २० डीव्ही ५७७४ ला अडविण्यात आले. वाहनांचे चालक शिवदत्त, वाघेला, रामदेव व नरेंद्र यांची यावेळी चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चारही चालकांसह दोन्ही वाहने राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आली. त्यानंतर मॅकेनिककडून दोन्ही वाहनांच्या सीट उघडण्यात आल्या. यावेळी सीटखाली तब्बल ३ कोटी ५० लाख ९ हजार १०० रुपयांची रोकड आढळून आली. या संदर्भात वाहनाच्या चालकांना विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी संपूर्ण व्यवहार हा फरशी स्टॉप येथील विना अपार्टमेंटमधील प्लॅटमधून चालत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सदर प्लॅटवर धाड टाकली. या प्लॅटमधून नीलेश व जिग्नेश यांना ताब्यात घेऊन १ लाख ५० हजारांची रोकड, पैसे मोजण्याचे दोन यंत्र, तीन मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात सहाही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक किसन मापारी, दुलाराम देवकर, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, दानिश शेख, अमोल खंडेझोड आदींनी केली.

आयकर विभागाचे अधिकारी करणार चौकशी

स्थानिक आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनी याबाबत नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत केले आहे. लवकरच नागपूर येथील अधिकारी अमरावतीत दाखल होऊन तपास करतील. त्यानंतर सदर रोकड ही हवालाची आहे की नाही, हे स्पष्ट होणार असे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी म्हंटले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments