Home ताज्या घडामोडी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्यापुढे खासदार नवनीत राणा यांनी मांडली पूर...

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्यापुढे खासदार नवनीत राणा यांनी मांडली पूर परिस्थितीची व्यथा

दिल्ली
ढगफुटी व अतिवृष्टीमुळे, दरडकोसल्यामुळे, महाराष्ट्रात उडालेला हाहाकार तसेच व अमरावती जिल्हात शेती,पशुधन व घरांचे प्रंचड नुकसान,अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले यासंदर्भात तातडीने पंचनामे करून केंद्रातर्फे भरीव सहकार्य करावे अशी मागणी खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचेकडे केली.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये असणाऱ्या आदिवासींना कृषी विज्ञान केंद्रामार्फत तांत्रिक कृषी विषयक प्रशिक्षण देण्यात यावे,आदिवासींसाठी धारणी येथे विशेष कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.
रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक व कमी शेती असलेल्या शेतकऱयांचा समावेश करून त्यांना रोजगार मिळावा अशी विनंतीही खासदार राणा यनू केली.
खासदार नवनीत राणा यांनी ढगफुटी व अतिवृष्टीने नुकसानग्रस्त अमरावती जिल्ह्याचा दौरा केला होता. हा दौरा करून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दिल्ली गेले व तात्काळ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या भयावह व दुर्दैवी परिस्थितीची जाणीव करून दिली. या ढगफुटी व अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आहे,जनजीवन विस्कळीत झाले असून,अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत,अनेक व्यक्ती वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, राज्यसरकार सध्याची परिस्थिती हाताळण्यास कमी पडत असून केंद्राने यात जातीने लक्ष घालावे व महाराष्ट्रातील ही भयावह परिस्थितीत जनतेला दिलासा द्यावा,या नैसर्गिक आपत्तीतुन जनतेला सावरण्यास मदत करावी अशी मागणी केली.
सोबतच ज्यांची गुरेढोरे वाहून गेली अश्या पशुधन मालकांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी,ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे परंतु पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत अश्या पीकविमा कंपन्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा यांनी यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचेकडे केली.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर यांनी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेऊन निराकरण करण्याचे सकारात्मक अभिवचन दिले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments