Home ताज्या घडामोडी आयआयएमसी द्वारे सत्र २०१९-२० चे पुरस्कार जाहीर; ...

आयआयएमसी द्वारे सत्र २०१९-२० चे पुरस्कार जाहीर; अमरावती केंद्रातून चैताली माहोरे, गौरी चंद्रा विजेते

अमरावती
भारतीय जन संचार संस्थेच्या अमरावती स्थित क्षेत्रीय केंद्रामधून चालविल्या जाणाऱ्या मराठी पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सत्र २०१९-२० मधून चैताली माहोरे , तर इंग्रजी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातुन गौरी चंद्रा या विध्यार्थिनिंनी प्रथम स्थान प्राप्त करीत प्रत्येकी रु. 5000 चा पुरस्कार पटकाविला आहे.

आयआयएमसीच्या सक्षम प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार कोविड विषाणू मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता शैक्षणिक वर्ष 2019-20 चा दीक्षांत समारंभ आयोजित केला जाणार नसल्याने पदविका प्रमाणपत्र आणि पुरस्कार स्पीड पोस्टद्वारे विध्यार्थ्यांच्या निवासस्थानी पाठविले जाणार आहे .

भारतीय जनसंचार संस्थाना तर्फे इंग्रजी , हिंदी सह उर्दू, मराठी, मल्याळम, ओडिया भाषेत पत्रकारितेचा पदविका तसेच रेडियो व टेलिव्हिजन आणि जाहिरात व जनसंपर्क विषयाचा स्वतंत्र एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम चालविण्यात येतो . अमरावती केंद्रात इंग्रजी आणि मराठी अभ्यासक्रम उपलब्ध आहे .
सर्व अभ्यासक्रमांमधून गुणानुक्रमे प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांना संस्थेतर्फे प्रत्येकी ५००० रुपये रोख पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

अमरावती केंद्राचे संचालक डॉ अनिल सौमित्र यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून कौतुक केले . भविष्यात अमरावती केंद्रात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे केंद्र निर्माण होणार असून पत्रकारिता व जनसंवाद क्षेत्रातील करियरच्या संधी निर्माण करण्यास संस्थान प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा विनय सोनुले, प्रा अनिल जाधव व प्रा संध्या झा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments