Home ताज्या घडामोडी डॉ.अनिल बोंडे यांनी ठोकले तहसीलदारांच्या दालनाला कुलूप

डॉ.अनिल बोंडे यांनी ठोकले तहसीलदारांच्या दालनाला कुलूप

मोर्शी 

अमरावती जिल्ह्यात म झालेल्या अतिवृष्टी आणि गारपीट झालेल्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पैशात घोळ झाले आहे. या प्रकरणी चौकशी करून, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी याच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करून, देखील तहसीलदारांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी तहसीलदार यांच्या दलनाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरामुळे मोर्शीत खकबळ उडाली.

शेतकऱ्यांच्या शेतामधील वीज कनेक्शन त्वरित सुरू करण्यात यावे. श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मानधन देण्यात येणारी बोगस यादीची चौकशी करावी. ती यादी रद्द करून, पात्र लाभार्थ्यांनाच मानधन वितरीत करण्यात यावे. या प्रमुख मागणी संदर्भात भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्शी तालुक्यामधील शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर येऊन धडकले होते.

यावेळी एक लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना देण्यात आले . यावेळी आंदोलना दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, म्हणुन अमरावती जिल्हा दंगा नियंत्रण पथक यांना पाचारण करण्यात आले होते. मोर्शीचे पोलीस देखील यावेळी तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments