Home विदर्भ कारगिल विजय दिवस

कारगिल विजय दिवस


मी सैनिक स्कुल दीपशिखा गुरूकुल, चिखलदरा येथून १० वी पास करत अमरावतीला ११ वी ला नुकताच प्रवेश घेतला होता.

दीपशिखा गुरूकुल ला शिकत असताना तिन वर्षात आई – बाबा फक्त एकदाच भेटायला आले होते. आता अकरावी करत असताना जेमतेम बाबांची भेट १ महिना झाली. या भेटीनंतर १२ वी लागली आणि या महिन्यात बाबा सुट्टी वर येणार, पुढल्या महिन्यात सुट्टी वर येणार असे करत करत इथे माझी परिक्षा येऊन ठेपली, आणि तिथे कारगिल मध्ये युद्ध !!!

तेव्हा माझ्या घरात असलेल्या या सैनिकाची किंमत सामान्य माणूस म्हणून मला कधीच माहिती नव्हती.
परंतू कारगिल च्या युद्धात सामिल असलेल्या एका सैनिकाच्या घरची परिस्थिती आणि माझ्या मित्रांच्या घरच्या परिस्थितीमध्ये जमिन आसमान चे अंतर होते. ह्या अंतरामुळेच मला आयुष्याचे ३० वर्षे देशसेवा करणाऱ्या सैनिकाची किंमत कळली.

कारगिल युद्ध संपले. माझे वडील सुखरूप परत आले, पण ज्यांचा सैनिक परत आला नाही,त्यांचा विचार केला तर आजही मन अस्वस्थ होतं. जिव कासाविस !!! परंतू कारगिल_विजय मिळवतांना, अश्या परिस्थितीत ज्या सैनिकांना विर मरण आले, त्या सर्वांना मी मनापासून सॅल्युट करतो. आज हा विजय दिवस आपण त्यांना स्मरून साजरा करतो आहे.

याच युद्धात सामिल झालेले आदरणीय निवृत्त थलसेना सैनिक रमेशराव_तराळ , सुभेदार मेजर आॅनरी लेफ्टनंट म्हणजे माझे प्रिय बाबा यांनी सांगितलेले युद्धातील प्रसंग आठवले की आजही अंगावर शहारे येतात. डोळ्यात अश्रू तरळतात.

हा दिवस आम्ही तुमच्या सारख्या शुर सैनिकांमुळे पाहू शकलो, बाबा. एक भारतीय नागरिक म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो आहे.

मर्द आम्ही मराठे खरे,
दुश्मनांना भरे कापरे,
देशरक्षा वया, धर्म तारावया
कोण झुंजास मागे सरे !! “

तुम्हाला मनापासून जय_हिंद !!!

रमेशराव जगन्नाथ तराळ ,
अध्यक्ष, अव्दैत, अमरावती

शब्दांकन
विशालरमेशतराळ ,
एक रंगसेवक, अमरावती

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments