Home ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यातील रेल्वे समस्या मार्गी लावा: खासदार नवनीत राणा यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती

अमरावती जिल्ह्यातील रेल्वे समस्या मार्गी लावा: खासदार नवनीत राणा यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती

नवी दिल्ली

अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार सौ नवनित रवी राणा या दिल्ली अधिवेशनदरम्यान अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आज त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन आज अमरावती जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नांसंदर्भात विविध समस्या मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली व सदर समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याची मागणी केली.
अकोला-अकोट-डाबका-धुळघाट मार्गे खंडवा जाणारा ब्रिटिशकालीन मार्ग परावर्तित करून तो मेळघाटच्या बाहेरून नेऊन मेळघाटातील आदिवासींना विकासापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत असल्याचे खासदार सौ नवनित रवी राणा यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्षात आणून दिले असता,रेल्वे मंत्र्यानी आपण यात जातीने लक्ष घालून हा मार्ग मेळघाटातून जावा यासाठी आपण सकारात्मक पाऊले उचलून संबंधितांना तसे निर्देश देणार असल्याचे अभिवचन रेल्वे मंत्र्यानी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांना दिले.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिद्धपुर हे तीर्थक्षेत्र जगभरातील महानुभावपंथीयांची काशी म्हणून ओळखले जाते,संपुर्ण देशातून या ठिकाणी महानुभाव पंथीय दर्शनासाठी येत असतात करिता अमरावती-नरखेड रेल्वे मार्गावर रिद्धपुर या ठिकाणी कायमस्वरूपी रेल्वे थांबा देऊन “रिद्धपुर “रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात यावे अशी मागणीही खासदार सौ नवणीत रवी राणा यांनी केली.
अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन,नया अमरावती रेल्वे स्टेशन व बडनेरा रेल्वे स्टेशन येथील रेल्वे स्थानक येथे नाविन्यपूर्ण विकासांदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली.
खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा यांच्या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक पाऊले उचलण्याचे अभिवचन दिले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments